महाराष्ट्र

परभणीत शिवसेना ठाकरे गटाचे सय्यद इक्बाल महापौर; भाजपच्या तिरूमला खिल्लारे यांना पराभवाचा धक्का

परभणी महानगरपालिकेच्या महापौरपदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सय्यद इक्बाल यांची निवड झाली आहे.

Swapnil S

परभणी : परभणी महानगरपालिकेच्या महापौरपदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सय्यद इक्बाल यांची निवड झाली आहे. या निवडणुकीत काँग्रेसने शिवसेना ठाकरे गटाला साथ देत निर्णायक भूमिका बजावली. सय्यद इक्बाल यांना एकूण ३९ मते मिळाली असून त्यामध्ये काँग्रेसच्या १२ नगरसेवकांच्या मतांचा समावेश आहे. तर भाजपचे उमेदवार तिरुमला खिल्लारे यांना २६ मते मिळाली.

महापौर निवडणुकीत काँग्रेसची भूमिका महत्त्वाची ठरली. चंद्रपूर महापालिकेत शिवसेना ठाकरे गटाने काँग्रेसला साथ न देता भाजपला समर्थन दिल्याने परभणीत काँग्रेस ‘वचपा’ काढेल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. मात्र, त्या चर्चांना पूर्णविराम देत काँग्रेसने परभणीत ठाकरे गटाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. या निकालामुळे परभणी महानगरपालिकेतील सत्तासमीकरणे स्पष्ट झाली आहेत. शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस यांची एकत्रित ताकद भाजपपेक्षा सरस ठरली. आगामी काळात शहराच्या विकासकामांवर या आघाडीचा काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नवीन महापौर सय्यद इक्बाल यांनी निवडीनंतर सर्व पक्षांना सोबत घेऊन शहराच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता आणि मूलभूत सुविधा यांना प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

भाजप, शिंदे सेनेची टीका

शिवसेना ठाकरे गटाने मुस्लीम महापौर निवडून आणल्याबद्दल भाजप व शिंदे सेनेने ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल चढवला. हिंदुत्वाच्या गप्पा मारणाऱ्या ठाकरे गटाचा हिंदुत्वाचा चेहरा आता उघड झाला असल्याची टीका भाजप व शिंदे सेनेने केली आहे.

Mumbai : महापौरांचा पती असल्याचे सांगत शिक्षकाच्या फोटोचा गैरवापर; बदनामीकारक यूट्यूब व्हिडीओप्रकरणी FIR दाखल

Mumbai : चेंबूरमध्ये धक्कादायक प्रकार! चारित्र्यावर संशय घेत गर्भवती प्रेयसीचा काढला काटा; प्रियकराला अटक

Video : चुकून लेडीज डब्यात चढला; धावत्या लोकलमधून उडी मारणार इतक्यात...

Navi Mumbai : रबाळे एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग; परिसरात धुराचे लोट, Video

शक्तिपीठ महामार्गासाठी भूसंपादनाला मिळाली गती; शेतकऱ्यांचा विश्वास जिंकण्यासाठी कार्यशाळांचे आयोजन