प्रातिनिधिक छायाचित्र  
महाराष्ट्र

एसटी तिकीट खरेदी स्मार्टकार्डमधून करता येणार; विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी आता NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक

बसस्थानकांवरच नोंदणीची प्रक्रिया पार पडणार असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. रोख व्यवहारांच्या पलीकडे जाऊन पारदर्शकता आणि सोयीस्कर सेवा देण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाने ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (एनसीएमसी) प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

Swapnil S

मुंबई : रोख व्यवहारांच्या पलीकडे जाऊन पारदर्शकता आणि सोयीस्कर सेवा देण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाने ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (एनसीएमसी) प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार एसटी महामंडळाच्या तिकिटासाठी आता स्मार्टकार्डचा वापर करण्यात येणार आहे. विविध सामाजिक सवलतींचा लाभ घेण्यासाठी हे स्मार्टकार्ड अनिवार्य असणार आहे.

सवलतींची अचूक नोंद, पारदर्शक प्रतिपूर्ती आणि रोखविरहित व्यवहार या तिन्ही गोष्टी एका कार्डमध्ये सामावल्या जाणार आहेत. या प्रकल्पासाठी महामंडळाने मे. ईबिक्स टेक्नोलॉजिस लि. आणि एनएसडीएल पेमेंट्स बँक यांच्याशी करार केला असून लवकरच सर्व आगारांमध्ये नोंदणी मोहीम सुरू होणार आहे.

असे मिळणार कार्ड

या नव्या योजनेत समाजातील विविध घटकांचा समावेश करण्यात आला आहे. शालेय व तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या ‘सरल’ क्रमांकाशी जोडलेले कार्ड दिले जाईल तसेच ज्येष्ठ नागरिक व महिला: अमृत ज्येष्ठ नागरिक, सर्वसाधारण ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना आधार संलग्न कार्ड मिळेल. दिव्यांग प्रवाशांना यूडीआयडी क्रमांक जोडून विशेष सुविधा असलेले कार्ड देण्यात येईल. त्याचप्रमाणे अधिस्वीकृतीधारक पत्रकार आणि राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांना विभागीय कार्यालय येथील मुख्यालय आगारामार्फत वितरण करण्यात येईल. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या सोयीसाठी ३००० हून अधिक अधिकृत एजंट नियुक्त करण्यात आले आहेत. बसस्थानकांवरच नोंदणीची प्रक्रिया पार पडणार असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.

बदलापुरात आठवड्यातून एक दिवस पाणीकपात; १६ ऑक्टोबरपासून चक्राकार पद्धतीने पाणीपुरवठा बंद

Mumbai : स्वतः बसवलेल्या CCTV मध्येच कैद झाला मृत्यूचा क्षण! घाटकोपरमध्ये भरधाव कारच्या धडकेत BMC कर्मचाऱ्याचा मृत्यू

पत्नीशी वाद टाळण्यासाठी बाल्कनीतून पळण्याचा प्रयत्न जीवावर; २१ व्या मजल्यावरून पडून पतीचा मृत्यू

Kalyan-Dombivli : केडीएमसीत ३६ तास पाणीकपात; १५ ऑक्टोबरला २४ तास पाणीपुरवठा बंद

CJP Protest : रांका, दास यांना ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी; तिहारमध्ये रवानगी, दिपके आक्रमक, म्हणाले - "हिंमत असेल तर...