महाराष्ट्र

नेमकं असं काय घडलं? शिवराज्याभिषेक सोहळ्यातून सुनिल तटकरेंचा काढता पाय

नवशक्ती Web Desk

आज (2 जून) किल्ले रायगडावर 350 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचं मोठ्या दिमाखात आयोजन करण्यात आलं होते. या सोहळयाला राज्यासह देशभरातील शिवभक्त तसंच राज्यातील सत्ताधारी आणि इतर पक्षाचे नेते उपस्थित होते. राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे यांची देखील या सोहळ्याला उपस्थिती होती. मात्र, शिवराज्याभिषेक सोहळा अर्ध्यावर आलेला असताना तटकरे यांनी या सोहळयातून काढता पाय घेतला आहे. यानंतर त्यांनी गडाच्या पायथ्याशी आल्यावर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत यामागचं कारण सांगितलं आहे.

कार्यक्रम अर्ध्यावर सोडून माघारी का फिरलात यावर बोलताना त्यांनी शिवराज्याभिषेक सोहळ्याचं राजकीयीकरण केल्याचा आरोप केला आहे. मी एक नागरिक म्हणून इथे आलो होतो. शिवराज्याशिषेक सोहळा पूर्ण होईपर्यंत मी शिवभक्त मावळा म्हणून उपस्थित होतो. मात्र, त्यानंतरचा कार्यक्रम राजकिय वाटल्याचं त्यांनी सांगितलं. मी या विभागाच्या लोकसभेचं प्रतिनिधीत्व करतो. एक शिवभक्त म्हणून माझ्या भावना छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी अर्पण करण्याची राजशिष्टाचारानुसार माझी संधी का डावलली गेली? याबाबत मला माहिती नाही, असं त्यांनी सांगितलं आहे.

राज्य सरकारकडून होणाऱ्या कार्यक्रमात एक राजशिष्टाचार असतो, पण आज माझ्यासाठी तो महत्वाचा नाही. कारण मी एक शिवभक्त म्हणून इथे उपस्थित होतो. मात्र, जेव्हा एखादा राजकीय विचार धरुन एखादी कृती सुरु झाल्याचं जाणवलं, तेव्हा शिवप्रभूंना वंदन करावं आणि इथून जावं", असं म्हणत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

टी-२० विश्वचषकावर दहशतवादी हल्ल्याचे सावट

पोलिस शिपाई विशाल पवारांना होतं दारूचं व्यसन; माटुंग्यातील बारमध्ये विकली होती अंगठी ...पोलीस तपासात काय आलं समोर?

भारताच्या दोन्ही रिले संघांना पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट!

"अजितदादा तुम्ही माझी ॲक्टिंग केल्याचं समजलं, पण...", रोहित पवारांचा रडण्याच्या नक्कलेवरून अजित पवारांना टोला

"मी जोरात ओरडले, माझ्या मदतीसाठी कोणीही...", राधिका खेरा यांनी गैरवर्तनाप्रकरणी काँग्रेसवर केले गंभीर आरोप