महाराष्ट्र

दोन जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

वृत्तसंस्था

नक्षलवादी सामान्य आदिवासींची हत्या करून भीती व दशहत पसरवण्याचे काम करीत असतानाच बुधवारी १२ लाखांचे बक्षीस असलेल्या माधुरी सुमन राजु मट्टामी (३४) व भामरागड एरिया टेक्निकल दलममध्ये एसीएम पदावर कार्यरत सिताराम बक्का आत्राम (६३) या दोन जहाल नक्षलवाद्यांनी पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या समोर आत्मसमर्पण केले. टीसीओसी कालावधीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाची ही यशस्वी कामगिरी मानली जात आहे.

आत्मसमर्पित नक्षलवादी रामसिंग उर्फ सिताराम बक्का आत्राम हा मार्च २००५ला अहेरी दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन कार्यरत झाला. तीन महिने पेरमिलीमध्ये कार्यरत होता. मे २००५पासून तो माड डिव्हिजन टेक्निकल दलममध्ये कार्यरत होता. २००७ ते २०१२पर्यंत उप-कमांडर पदावर कार्यरत होता. २०१२ ते मार्च २०२२ पर्यंत भामरागड एरिया टेक्निकल दलममध्ये एसीएम पदावर पर्यंत कार्यरत होता. रामसिंगवर १ खून, १ चकमक व इतर १ असे एकूण ३ गुन्हे दाखल आहेत. मौजा कासमपल्ली, गुंडुरवाही, हीकेर, आशा-नैनगुडा, आलदंडी चकमकीत तो सहभागी होता. माधुरी उर्फ भुरी उर्फ सुमन राजु मट्टामी ही नोव्हेंबर २००२ ला कसनसुर दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन डिसेंबर २०१२ पर्यंत कार्यरत होती. डिसेंबर २०१२ ते २०१३ पर्यंत ती भामरागड दलममध्ये कार्यरत होती. फेब्रुवारी २०१३ ते एप्रिल २०२२ पर्यंत पेरमिली दलममध्ये ती एसीएम पदावर कार्यरत होती. माधुरीवर ४ खून, २१ चकमक, ७ जाळपोळ आणि इतर ५ असे एकूण ३७ गुन्हे दाखल आहेत.

८९ हजार कोटींच्या गुंतवणुकीला चालना; पाच अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन, २० हजार प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार

देशात उष्णतेचा कहर; वाढत्या तापमानात पंतप्रधान मोदींचे नागरिकांना आवाहन, पुरेसे पाणी प्या आणि 'या' गोष्टींची काळजी घ्या

Mumbai : मुलुंड डम्पिंग ग्राऊंडला युद्धाचा फटका; डिझेलच्या कमतरतेमुळे काम करणे अशक्य, कचरा वाहून नेण्यासाठी होतेय अडचण

Mumbai : मध्य रेल्वेकडून दरवाढीचा प्रस्ताव रद्द; रेल्वे स्टॉलवरील वडा पाव-समोसा जुन्याच किंमतीत मिळणार

Mumbai : लोकलमध्ये दाम्पत्य विसरले १० लाखांच्या दागिन्यांची बॅग; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे ऐवज सापडला