एक्स @advakash
महाराष्ट्र

‘टेस्ट टू ट्रिटमेंट’ कामगारांसाठी नवसंजीवनी; ५० लाखांहून अधिक कामगारांची आरोग्य तपासणी - आकाश फुंडकर

कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून शिक्षण, विवाह, गरोदरपण, आरोग्य तपासणी आणि अपघात सहाय्यता यासारख्या योजना राबवण्यात येतात.

Swapnil S

मुंबई : कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून शिक्षण, विवाह, गरोदरपण, आरोग्य तपासणी आणि अपघात सहाय्यता यासारख्या योजना राबवण्यात येतात. त्यापैकी टेस्ट टू ट्रिटमेंट" या योजनेअंतर्गत ५० लाखांहून अधिक कामगारांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून गंभीर आजारांसाठी २ लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य दिले जात असल्याचे कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांनी विधानपरिषदेत सांगितले.

केंद्र सरकारच्या अधिनियमाच्या अनुषंगाने २००७ मध्ये राज्यात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात आले. या मंडळाद्वारे जमा होणारा १ टक्का उपकर हा कामगारांच्या कल्याणासाठी वापरण्यात येतो. फेब्रुवारी २०२५ अखेर ५५,९४,३५४ कामगारांची नोंदणी झालेली असून त्यापैकी ३२ लाख बांधकाम कामगार सक्रिय असल्याचे मंत्री ॲड आकाश फुंडकर यांनी सांगितले.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानपरिषद सदस्य सर्वश्री अभिजित वंजारी, शशिकांत शिंदे, प्रवीण दरेकर, विक्रम काळे, सदाशिव खोत, राजेश राठोड, कृपाल तुमाने, सत्यजित तांबे, शिवाजीराव गर्जे, अमोल मिटकरी, पंकज भुजबळ या सदस्यांनी विधानपरिषद नियम २६० अन्वये आपली भूमिका मांडली होती, त्यास मंत्री फुंडकर यांनी उत्तर दिले. कामगार विभागाच्या संदर्भात झालेल्या चर्चेदरम्यान कामगार मंत्री फुंडकर यांनी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या कार्यपद्धतीवर सविस्तर माहिती दिली. त्यांनी मंडळाच्या माध्यमातून कामगारांसाठी राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांची आणि त्यामध्ये होणाऱ्या सुधारणांवर माहिती दिली.

सभागृहात काही सदस्यांनी मंडळामध्ये झालेल्या खर्चाबाबत आणि गैर व्यवहाराबाबत प्रश्न उपस्थित केला. यावर कामगार मंत्री फुंडकर यांनी सांगितले की, सुरुवातीच्या काळात नोंदणी प्रक्रियेमध्ये काही त्रुटी होत्या, मात्र आता संपूर्ण प्रणाली अधिक पारदर्शक करण्यासाठी सुधारणा करण्यात आल्या आहेत. तालुकावार लॉगिन आयडी प्रणाली, ऑनलाइन नोंदणी आणि बायोमेट्रिक व दस्तऐवज पडताळणी यांसारख्या उपाययोजना लागू करण्यात आल्या असल्याचे ही मंत्री फुंडकर यांनी यावेळी सांगितले.

बांधकाम कामगारांच्या कौशल्यवृद्धीसाठी बार बेंडिंग, प्लंबिंग, इलेक्ट्रिशियन, वेल्डिंग यांसारख्या आठ ट्रेडमध्ये १५ दिवसांचे मोफत प्रशिक्षण दिले जात आहे. प्रशिक्षण कालावधीसाठी प्रत्येकी ४२०० रुपये वेतन नुकसान भरपाई आणि प्रशिक्षणासाठी ५८० रुपये शासन देत आहे. त्याचबरोबर कामगारांची नोंदणी अधिक सुलभ करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे.

'मुरासू' चक्रीवादळाचा धोका वाढला; चेन्नईत शाळा-कॉलेजला सुट्टी; आंध्रला रेड अलर्ट, महाराष्ट्रातही पावसाचा इशारा

Thane : येऊरमध्ये ‘हॅलोविन पार्टी’वर पोलिसांची धाड; ७० हून अधिक तरुण-तरुणी उपस्थित, मद्यपान आणि प्रतिबंधित ई-सिगारेटचा वापर

Mumbai : सहा मजली इमारत, सांस्कृतिक दालन, व्यायामशाळा, प्रशस्त सभागृह; नवीन पालिका सभागृहात आसन क्षमता १०० ने वाढणार

भारताची पहिली बुलेट ट्रेन आकाराला येतेय; ५५७ प्रवासी क्षमता; ताशी २४९ किमी वेग, बेंगळुरूच्या कारखान्यात बीईएमएलकडून ८ डब्यांची ट्रेन

Pankaja Munde Ramp Walk : मंत्री पंकजा मुंडेंचा हटके अंदाज; हॅण्डलूम साडीतील रॅम्प वॉक चर्चेत, Video