महाराष्ट्र

नांदेडमध्ये एकाच दिवशी तीन बालविवाह रोखले

नांदेड जिल्‍हा बालविवाह मुक्‍त करण्‍यासाठी जिल्‍हाधिकारी अभिजीत राऊत हे अथक परिश्रम घेत आहेत. जिल्‍ह्यात अजानतेपणी बालविवाह घडत असल्‍याच्‍या तक्रारी महिला बाल विकास विभागास प्राप्‍त होताना दिसून येत आहेत.

Swapnil S

नांदेड : नांदेड जिल्‍हा बालविवाहमुक्‍तीकडे वाटचाल करत असताना नांदेड जिल्‍ह्यातील वेगवेगळ्या तालुक्‍यात बालविवाहाच्‍या एकाच दिवशी घडणाऱ्या तीन घटनांना महिला व बालविकास विभाग व जिल्‍हा प्रशासन, पोलीस प्रशासन यांच्‍या सहकार्याने रोखण्‍यात यश आले. बालविवाह रोखण्‍यासाठी ग्राम बाल संरक्षण समितीने आपली भूमिका कर्तव्‍यदक्षपणे पार पाडावी, असे आवाहन जिल्‍हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले

नांदेड जिल्‍हा बालविवाह मुक्‍त करण्‍यासाठी जिल्‍हाधिकारी अभिजीत राऊत हे अथक परिश्रम घेत आहेत. जिल्‍ह्यात अजानतेपणी बालविवाह घडत असल्‍याच्‍या तक्रारी महिला बाल विकास विभागास प्राप्‍त होताना दिसून येत आहेत. नुकतेच नांदेड जिल्ह्यातील मुखेड व कंधार येथे उच्‍चशिक्षित मुलासमवेत अल्‍पवयीन मुलीचे बालविवाह होत असल्‍याबाबतची गोपनीय माहिती जिल्‍हा प्रशासनाला मिळाली. हे बालविवाह रोखण्‍यासाठी जिल्‍हाधिकारी अभिजीत राऊत यांनी संबंधित यंत्रणाना तात्‍काळ निर्देश दिले.

जिल्हा प्रशासनाकडून समुपदेशन

त्‍यानुसार जिल्‍हा महिला व बालविकास अधिकारी आर. आर. कागणे, जिल्‍हा बाल संरक्षण अधिकारी विद्या आळणे यांनी सदर घटनेची गोपनियरित्‍या शहानिशा करून कर्मचाऱ्यांना घटनास्‍थळी पाठवून होणारे बालविवाह समुपदेशनाच्‍या माध्‍यमातून थांबविण्‍यात आले. हे बालविवाह रोखण्‍यात पोलीस प्रशासनाने अत्‍यंत महत्‍वाची भूमिका पार पाडली. त्‍यामुळे हे बालविवाह रोखणे सहज शक्‍य झाले. हे बालविवाह रोखण्‍यासाठी कल्‍पना राठोड, शितल डोंगे, ऐश्‍वर्या शेवाळे, दिपाली हिंगोले, निलेश कुलकर्णी यांचे महत्‍वाचे योगदान लाभले.

Maharashtra Nagar Parishad Election Result 2025 Live Updates : निवडणुकांमध्ये बाजी कोणाची? कोणत्या जिल्ह्यात काय स्थिती?

"तेच मशीन, तीच सेटिंग अन् तोच पैसा..." निवडणुकांच्या निकालावर संजय राऊतांची संतप्त प्रतिक्रिया

"आज माझ्या एका डोळ्यात आनंद तर दुसऱ्या डोळ्यात अश्रू..." विजयानंतर निलेश राणेंची पहिली प्रतिक्रिया

Thane : अवैध बांधकाम केल्यास नगरसेवक पद जाणार; निवडणुकीपूर्वी उमेदवारांना द्यावे लागणार शपथपत्र

आता टोल नाक्यांवर AI; जाता येणार ८०च्या वेगाने; थांबण्याची, ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी