उद्धव ठाकरे संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

निवडणूक आयोगाला फक्त चिन्ह देण्याचा अधिकार; उद्धव ठाकरेंची टीका

हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावरून मनसे-शिवसेना एकत्र आले. मात्र युतीबाबत अद्याप कोणी जाहीरपणे बोलत नसले तरी ‘निवडणुका जाहीर तर होऊ दे,’ असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. निवडणूक आयोगाला चिन्ह देण्याचा अधिकार आहे. मात्र पक्षाचे नाव बदलण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर टीका केली.

Swapnil S

मुंबई : हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावरून मनसे-शिवसेना एकत्र आले. मात्र युतीबाबत अद्याप कोणी जाहीरपणे बोलत नसले तरी ‘निवडणुका जाहीर तर होऊ दे,’ असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. निवडणूक आयोगाला चिन्ह देण्याचा अधिकार आहे. मात्र पक्षाचे नाव बदलण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर टीका केली. २० ऑगस्टला शिवसेना चिन्ह व पक्ष याचा निकाल देणार, हे समाधानकारक आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

उद्धव ठाकरे म्हणाले की, “काही वर्षांपूर्वी एअर फोटोग्राफी केली होती, ती गडकिल्ल्यांची. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे, ही अभिमानाची बाब आहे.”

स्मारकाचा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे काम काही तांत्रिक कारणांमुळे रखडले आहे. तरीही बाळासाहेबांच्या स्मारकाबाबत मुख्यमंत्र्यांना विचारले तर ते अधिक सांगतील, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या स्मारकाचा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात ढकलला.

मराठी भाषेसाठी विकास केंद्रे उभारणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा

Thane : बारवी धरणक्षेत्राला पावसाची प्रतीक्षा; यंदाच्या पावसाळ्यात अवघ्या १७ मिमी पावसाची नोंद

'मानिकी' उपचारासाठी 'वनतारा'मध्ये दाखल; वर्षानुवर्षांच्या यातनांनंतर वेदनादायी प्रवासाचा अंत

Mumbai : पिण्याच्या पाण्याची स्थिती गंभीर; धरण क्षेत्रात समाधानकारक पावसाची प्रतीक्षा

प्रथमच 'फायर इंजिन'चे स्टेअरिंग महिलेच्या हाती; आत्मविश्वास असेल तर अशक्य ही शक्य - पल्लवी पाटील यांचा विश्वास