आयएएनएस
महाराष्ट्र

केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेडछाड; संत मुक्ताई यात्रेतील घटना, एका आरोपीला अटक, इतर टवाळखोरांचा शोध सुरू

केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची व तिच्या मैत्रिणींची संत मुक्ताई यात्रेत छेडछाड केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी अनिकेत भोई याला अटक केली आहे. तसेच इतर टवाळखोरांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.

Swapnil S

जळगाव/प्रतिनिधी

केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची व तिच्या मैत्रिणींची संत मुक्ताई यात्रेत छेडछाड केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी अनिकेत भोई याला अटक केली आहे. तसेच इतर टवाळखोरांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावात महाशिवरात्रीनिमित्त आदिशक्ती मुक्ताबाईची यात्रा भरते. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांची कन्या या यात्रेत फराळ वाटप करत होती. यावेळी भोई नावाचा तरुण तिचा पाठलाग करत होता. त्यानंतर रक्षा खडसे यांची कन्या यात्रेमध्ये सायंकाळच्या वेळेस मैत्रिणींबरोबर फिरायला गेली असता भोई व इतर काही टवाळखोरांनी तिचा पाठलाग केला. ती ज्या पाळण्यामध्ये बसत होती, त्याच पाळण्यामध्येही हा तरुण बसला. त्यानंतर काही व्हिडीओ त्याने चित्रीत केले. ही बाब सुरक्षारक्षकाच्या लक्षात येताच त्यांनी त्याला मज्जाव केला. परंतु टवाळखोरांनी त्यांच्याशी झटापट केली.

‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल

या घटनेनंतर मंत्री रक्षा खडसे संतप्त झाल्या. त्यांनी थेट मुक्ताईनगर पोलीस ठाणे गाठून टवाळखोरांना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली. छेडछाड करूनही टवाळखोर तरुण मोकाट असल्याने रक्षा खडसे यांनी पोलिसांना फैलावर घेतले. त्यानंतर मुक्ताईनगर पोलिसांनी अनिकेत भोई, पियूष मोरे, सोम माळी, अनुज पाटील, किरण माळी या पाच जणांविरोधात ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल केला. यापैकी अनिकेत भोई याला पोलिसांनी अटक केली असून, इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

गुंडांना स्थानिक नेत्यांचे संरक्षण - एकनाथ खडसे

राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राज्यभरात अशा घटना वारंवार घडत आहेत. हे लोक गुंड आहेत. त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. पोरींचे त्यांनी व्हिडीओ रेकॉर्डिंग केले. त्याचवेळी पोलिसांनी त्याला अडवले होते, पण त्यांनी पोलिसांनादेखील मारहाण केली. पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पण ते जामिनावर सुटले. त्यांची इतकी हिंमत होते की ते पोलिसांनादेखील मारहाण करतात. त्यांना स्थानिक लोकप्रतिनिधींचे संरक्षण आहे, असा आरोप रक्षा खडसे यांचे सासरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनीदेखील राज्यात महिला सुरक्षित नसल्याचे पुन्हा दिसून आल्याचे म्हटले आहे.

आई म्हणून येथे आले - रक्षा खडसे

कोथळी येथे महाशिवरात्रीनिमित्त भरलेल्या यात्रेत माझ्या मुलीची काही टवाळखोर तरुणांनी छेड काढल्याचा प्रकार घडला. संबंधित तरुणांना गार्डने रोखण्याचा प्रयत्न केला असता त्याची कॉलर पकडून त्यालाही धक्काबुक्की करण्यात आली. शाळेत जाणाऱ्या मुलींनादेखील संबंधित टोळक्याकडून त्रास दिला जातो. त्यामुळे आज मंत्री म्हणून नव्हे तर आई म्हणून मी येथे आले आहे, असे केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. पोलिसांचा धाक संपला आहे काय? या लोकांची हिंमत कशी वाढली, असा सवालही त्यांनी केला. रक्षा खडसे यांनी पोलीस स्टेशनला भेट दिली, त्यावेळी त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणावर महिला व नागरिक जमा झाले होते.

बोलणी फिस्कटली; आंदोलन सुरूच! मनोज जरांगे-शिंदे समिती यांच्यातील चर्चा निष्फळ, हैदराबाद गॅझेट लागू करण्यास सरकारची तत्त्वतः मंजुरी

रेल्वे स्टेशनमध्ये दोन दिवस राहा फक्त दहा रुपयांत...आंदोलकांच्या व्हॉट्सअपवर मेसेज व्हायरल, वाशीतील एक्झिबिशन सेंटरमध्ये व्यवस्था

मराठा आंदोलकांनी केला चक्काजाम; जरांगे-पाटील यांच्या आवाहनानंतर रस्ता मोकळा

इशाऱ्यानंतर पालिका प्रशासनाचे नमते! फिरत्या शौचालयासह पुरवल्या इतर सुविधा; आंदोलकांसाठी पाण्याचे टँकर्सही अखेर उपलब्ध

Maratha Reservation Protest : मुंबईच्या रस्त्यांवर संगीत, नृत्य आणि कठपुतळीचा नाचही!