महाराष्ट्र

Unseasonal Rain In Maharashtra: येत्या २४ तासांत राज्यात अवकाळीची शक्यता; हवामान खात्याकडून 'या' जिल्ह्यात 'यलो अलर्ट' जारी

येत्या एक डिसेंबरदरम्यान बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे

नवशक्ती Web Desk

राज्यात मागील दोन दिवसात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. काही ठिकाणी गारपीट झाल्याने फळबागांचं देखील मोठ नुकसान झालं आहे. आता पुढील २४ तासांसाठी मराठवाडा, मध्यमहाराष्ट्र आणि विदर्भासह कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

अवकाळी पावसाने जोर धरल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यातील हे अवकाळी वातावरण आणखी काही दिवसांसाठी कायम राहणार आहे. येणाऱ्या २४ तासांत मराठवाडा, मध्ये महाराष्ट्र आणि विदर्भासह कोकणातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली असून 'येलो अलर्ट' देखील देण्यात आला आहे. काही भागात सोसाट्याचा वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

सद्यस्थितीत अरबी समुद्रात नैऋत्येपासून चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाल्यामुळे हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण होताना दिसत आहे. यामुळे अवकाळी पाऊस इतक्यात पाठ सोडणार नसल्याचं चित्र आहे. जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड आणि विर्भातील अकोल, अमरावती, नागपूर, गोंदियामध्ये 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे. अवकाळी पावसामुळे राज्यातील हवामानात बदल होत असून कमाल आणि किमान तापमानात चढउतार दिसून येत आहे. दरम्यान, येत्या एक डिसेंबरदरम्यान बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे वातावरणात पुन्हा एकदा मोठे बदल होण्याची शक्यता आहे.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी