Pune : शरद पवार गटाच्या विकास लवांडेंवर शाईफेक 
महाराष्ट्र

Pune : शरद पवार गटाच्या विकास लवांडेंवर शाईफेक

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शनिवारी पुण्यातील हवेली तालुक्यात शाईफेक करण्यात आली.

Swapnil S

मुंबई: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शनिवारी पुण्यातील हवेली तालुक्यात शाईफेक करण्यात आली. साधुसंतांना 'घुसखोर' म्हणणे हा संत समाजाचा अपमान असून तो सहन केला जाणार नाही. असे सांगत या प्रकरणातील आरोपी संग्राम बापू भंडारे यांनी या घटनेचे समर्थन केले आहे, तर काँग्रेसने याप्रकरणी कारवाईची मागणी केली आहे.

शाईफेकीची माहिती लवांडे यांनी 'एक्स'वर दिली. आज माझे आळंदीतील प्रवचन संपल्यानंतर गुंड संग्राम भंडारेसह त्याच्या साथीदारांनी माझी गाडी अडवून अंगावर शाई ओतली. धक्काबुक्की करत पिस्तूल दाखवून ते पळून गेले.

आमदार लांडगेंकडून समर्थन

भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी लवांडे यांच्यावरील शाईफेकीचे समर्थन केले आहे. हिंदुत्ववादी कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांनी व्यक्त केलेल्या निषेधाचे आम्ही जाहीर समर्थन करतो. देव-देश-धर्म आणि संत परंपरेचा अवमान करणाऱ्या प्रवृत्तीला लोकशाही मार्गाने ठोस उत्तर दिले गेले पाहिजे, हीच आमची ठाम भूमिका आहे. महाराष्ट्राचा स्वाभिमान असलेल्या वारकरी संप्रदायाबद्दल अभद्र, अपमानास्पद आणि द्वेषपूर्ण वक्तव्य करणाऱ्या विकास लवांडे यांचा आम्ही तीव्र निषेध करतो, असे लांडगे यांनी म्हटले आहे.

हल्लेखोरांवर कठोर कारवाई करा - सपकाळ

विकास लवांडे यांच्यावरील शाईहल्ला, धक्काबुक्की आणि शिवीगाळ हा भ्याड हल्ला असून हल्लेखोर वारकरी संप्रदायाच्या विचाराला मानणारे नाहीत. या प्रकरणाला भाजपची चिथावणी असून अशा हल्लेखोरांना भाजप सरकार संरक्षण देत आले आहे. विकास लवांडे यांच्यावरील हल्ला हा वारकरी संप्रदायाचा अपमान असून या हल्लेखोरांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

ई-२० इंधनाचा वापर सुरक्षितच; वाहन विम्याच्या वैधतेवर परिणाम होणार नसल्याचा सरकारचा दावा

Venezuela Earthquake : भीषण भूकंपाने व्हेनेझुएला हादरला! ३२ जणांचा मृत्यू, ७०० हून अधिक जखमी; इमर्जन्सी जाहीर

'बँक ऑफ इंडिया'ला १ कोटी डॉलर्स देण्याचे नीरव मोदीला आदेश

भारत-अमेरिका व्यापार करारातील तरतुदींचा आढावा; शुल्क आकारणीतील अडथळे कमी करण्यावर भर

मराठी भाषेसाठी विकास केंद्रे उभारणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा