एक्स @Dev_Fadnavis
महाराष्ट्र

मुख्यमंत्री फडणवीस दावोसला दाखल; मराठमोळ्या पद्धतीने जोरदार स्वागत

दावोसला होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तेथे दाखल झाले आहेत.

Swapnil S

मुंबई : दावोसला होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तेथे दाखल झाले आहेत. फडणवीस यांचे स्वित्झर्लंड येथे मराठमोळ्या पद्धतीने जोरदार स्वागत करण्यात आले.

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरवर नेण्यासाठी व रोजगार निर्मितीकडे राज्य सरकारने सध्या लक्ष केंद्रित केले आहे.

दावोसमध्ये जागतिक आर्थिक परिषद २० ते २४ जानेवारीदरम्यान आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेला जागतिक नेते व मोठमोठ्या कंपन्यांचे सीईओ हजर असतात. यापूर्वी फडणवीस त्यांच्या पहिल्या कार्यकाळात तीन वेळा दावोसमधील या परिषदेत सहभागी झाले होते. त्यानंतर मुंबईत दोन वेळा ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ या गुंतवणूक परिषदेचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वात आयोजन झाले होते. यामुळे महाराष्ट्र औद्योगिक गुंतवणुकीत पाचव्या स्थानावरून पहिल्या क्रमांकावर आला होता.

या दावोस दौऱ्यात गुंतवणूकदारांना आकर्षित करता येईल या दृष्टीने भरगच्च कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री फडणवीस अनेक जागतिक नेत्यांच्याही भेटी घेणार आहेत. या दौऱ्यात उद्योगमंत्री उदय सामंत, तसेच एमआयडीसी, एमएमआरडीए, सिडको यांचे अधिकारी व उद्योगांचे शिष्टमंडळ सहभागी होणार आहे. डेटा सेंटर्स, ऑटोमोबाइल्स, सेमीकंडक्टर, ईव्ही, इलेक्ट्रॉनिक्स, स्टील, अन्नप्रक्रिया, वस्त्रोद्योग, औषधी आणि पायाभूत सुविधा इत्यादी क्षेत्रात मोठ्या संख्येने सामंजस्य करार या दौऱ्यात होणार आहेत. महाराष्ट्राची १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक राज्यात आणण्याचा प्रयत्न या दौऱ्यातून केला जाणार आहे.

ठाकरे सेना-मनसे एकत्र? नव्या युतीची आठवडाभरात होणार घोषणा

अजित पवारांना हवीय महायुती? राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मुख्यमंत्र्यांना भेटणार

विधिमंडळातील संख्याबळात महायुतीला फायदा; विरोधी पक्षनेतेपदाबाबत काँग्रेस अडचणीत

जागावाटपाचा निर्णय दोन दिवसांत - मुख्यमंत्री; शिंदे सेनेची ६० जागांवर बोळवण?

बेटिंग ॲप : युवराज, सोनू सूदसह अनेकांची मालमत्ता जप्त; ED ची मोठी कारवाई; उथप्पा, उर्वशी रौतेला, मिमी चक्रवर्ती यांचाही समावेश