महाराष्ट्र

Nanded : दोन मुलांसह शिक्षकाची आत्महत्या; कार थेट गोदावरी नदीत, व्हॉट्सॲप स्टेटसमध्ये वरिष्ठांवर गंभीर आरोप

नांदेड जिल्ह्यात एका जिल्हा परिषद शिक्षकाने आपल्या दोन लहान मुलांसह कार गोदावरी नदीवरील पुलाचे रेलिंग तोडून थेट पाण्यात पाडल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली.

Krantee V. Kale

छत्रपती संभाजीनगर : नांदेड जिल्ह्यात एका जिल्हा परिषद शिक्षकाने आपल्या दोन लहान मुलांसह कार गोदावरी नदीवरील पुलाचे रेलिंग तोडून थेट पाण्यात पाडल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. या दुर्घटनेत शिक्षक आणि त्याच्या दोन्ही मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असून, प्राथमिक तपासात ही आत्महत्या असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

सुनील मोरे (वय ४२) असे मृत शिक्षकाचे नाव असून, ते हिमायतनगर येथील पोता बुद्रुक जिल्हा परिषद शाळेत कार्यरत होते. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी आपल्या व्हॉट्सॲपवर एक स्टेटस ठेवले होते. यामध्ये त्यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रचंड मानसिक छळ व त्रास दिला जात असल्याचा गंभीर आरोप केला होता. याच त्रासाला कंटाळून मी माझ्या दोन्ही मुलांसह जीवनप्रवास संपवत असल्याचे त्यांनी स्टेटसमध्ये लिहिले होते.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

दिल्लीत ५ मजली PG इमारत जमीनदोस्त; एकाचा मृत्यू, अनेक विद्यार्थी ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

VIDEO : जखमी गोविंदांच्या उपचारावरून पालघरच्या रुग्णालयात कर्मचाऱ्याला मारहाण; शिवसेना आमदार पुत्रासह १७ जणांवर गुन्हा

जन्माष्टमीच्या रात्री संतापजनक प्रकार! मंदिरात जात असलेल्या १४ वर्षीय मुलीचं अपहरण अन्...

Mumbai : गणेशभक्तांना दिलासा; मध्यरात्रीपर्यंत धावणार ॲक्वा लाईन मेट्रो, जाणून घ्या वेळ

Delhi : उशिरा घरी परतल्याने कुटुंबीय रागावले; १३ वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल