Mumbai : आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनासाठी चाहत्यांची गर्दी; शिवाजी पार्क येथे शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार, VIDEO 
मुंबई

Mumbai : आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनासाठी चाहत्यांची गर्दी; शिवाजी पार्क येथे शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार, VIDEO

आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर चाहत्यांची गर्दी उसळली असून, शिवाजी पार्क येथे आज शासकीय इतमामात त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू आहे.

Mayuri Gawade

भारतीय संगीतविश्वातील दिग्गज पार्श्वगायिका आशा भोसले यांना आज मुंबईत अखेरचा निरोप दिला जाणार आहे. रविवारी (दि. १२) वयाच्या ९२व्या वर्षी मल्टी-ऑर्गन फेल्युअरमुळे त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण देशभरातून शोक व्यक्त केला जात असून, आज त्यांच्या अंत्यदर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर चाहत्यांची गर्दी अंत्यदर्शनासाठी चाहत्यांची गर्दी, आहे.

अंतिम दर्शनासाठी चाहत्यांची गर्दी

आशा भोसले यांचे पार्थिव लोअर परळ येथील त्यांच्या निवासस्थानी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. या ठिकाणी चाहत्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

शिवाजी पार्क येथे सायंकाळी अंत्यसंस्कार

आशा भोसले यांच्यावर आज सायंकाळी ४ वाजता दादर येथील स्व. भागोजी बाळूजी कीर हिंदू स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या अखेरच्या प्रवासासाठी शिवाजी पार्क परिसरात विशेष तयारी करण्यात आली असून, फुलांच्या सजावटीतून त्यांना आदरांजली अर्पण केली जात आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही काल त्यांच्या निवासस्थानी जाऊन आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहिली.

चित्रपट आणि संगीत क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती अपेक्षित

अंत्यदर्शनानंतर होणाऱ्या अंत्यसंस्कारासाठी चित्रपट आणि संगीत क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्ती तसेच राजकीय नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. आशा भोसले यांच्या जाण्याने भारतीय संगीतविश्वातील एक युग संपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

आवाज बंद कर डीजे, तुला ‘बाप्पा’ची शपथ हाय...; मुंबईकरांनीही दिली 'डीजे'च्या दणदणाटाविरोधात हाक, गणेशोत्सव मंडळेही सरसावली

Mumbai : एआय गॉगल्स, चष्म्यामुळे छुप्या रेकॉर्डिंगचा धोका; पालिका कार्यालयात तातडीने बंदी घाला - सचिन पडवळ

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मिळणार सुगंधी दूध; येत्या १५ सप्टेंबरपासून राज्यभर पुरवठा

Mumbai : बाप्पाच्या आगमनावेळी चपलांचा ढीग; लालबाग, परळमध्ये सापडलेल्या चार मेट्रिक टन चपलांचा पुनर्वापर

पोलिसांकडूनच अमली पदार्थांची विक्री; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंत्र्यांचा आरोप, २०२९ पर्यंत समूळ उच्चाटनाचा निर्धार