जेष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती खालावली; 'ब्रीच कँडी'त उपचार सुरू  
मुंबई

जेष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती खालावली; 'ब्रीच कँडी'त उपचार सुरू

हिंदी सिनेमासृष्टीतील ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना शनिवारी कार्डियाक अरेस्ट आला. त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयातील आपत्कालीन वैद्यकीय विभागात उपचार सुरू आहेत.

Krantee V. Kale

मुंबई : हिंदी सिनेमासृष्टीतील ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना शनिवारी कार्डियाक अरेस्ट आला. त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयातील आपत्कालीन वैद्यकीय विभागात उपचार सुरू आहेत.

ब्रीच कँडीचे डॉ. प्रतीत समदानी यांनी सांगितले की, ९२ वर्षीय आशा भोसले यांना कार्डियक अरेस्ट आला. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. आशा भोसले रुग्णालयात दाखल झाल्याचे वृत्त कळताच त्यांचे चाहते त्या लवकरात लवकर बरा व्हाव्यात यासाठी प्रार्थना करत आहेत.

दरम्यान, त्यांची नात जनाई भोसले हिने सोशल मीडियावर माहिती देत सांगितले की, आजी आशा भोसले यांना अतिशय थकवा आणि छातीत इन्फेक्शन झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या उपचार सुरू असून लवकरच सर्व काही सुरळीत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करत तिने सर्वांनी कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करावा, अशी विनंतीही केली आहे.

आशा भोसले या ७० वर्षांहून अधिक काळ भारतीय चित्रपटांमध्ये पार्श्वगायिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी २० भाषांमध्ये १२ हजाराहून अधिक गाणी गायली आहेत.

केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार ६,९०८ रुपयांचा बोनस

Kolkata Stampede : कोलकात्यात दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी; १९ जणांचा मृत्यू, मृतांच्या कुटुंबीयांना २५ लाखांची मदत

FSSAI चा नेस्ले इंडिया, हिंदुस्थान युनिलिव्हरला दणका; दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींमुळे नोटीस

दांडिया खेळताना अचानक कोसळला लाइटचा स्टँड; इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीचा मृत्यू, हादरवणारा VIDEO

दसऱ्याला दारात लावा झेंडू-आंब्याच्या पानांचं खास तोरण; पाहा ७ सुंदर, हटके आणि बजेट-फ्रेंडली डिझाईन्स