X (@mybmc)
मुंबई

आशा भोसले यांना पालिकेत श्रद्धांजली

स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांचे १२ एप्रिल रोजी हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी शिवाजी पार्क स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. तर मुंबई महापालिका मुख्यालयातील सभागृहात महापौर रितू तावडे यांच्यासह सर्वपक्षीय गटनेते, ज्येष्ठ नगरसेवकांनी दुःख व्यक्त करत आणि जुन्या आठवणींना उजाळा देत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली.

Swapnil S

मुंबई : स्वरसम्राज्ञी, पद्मविभूषण, ख्यातनाम पार्श्वगायिका आशा भोसले यांचे १२ एप्रिल रोजी हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी शिवाजी पार्क स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. तर मुंबई महापालिका मुख्यालयातील सभागृहात महापौर रितू तावडे यांच्यासह सर्वपक्षीय गटनेते, ज्येष्ठ नगरसेवकांनी दुःख व्यक्त करत आणि जुन्या आठवणींना उजाळा देत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली. त्यानंतर महापालिकेचे पुढील कोणतेही कामकाज न करता पालिका सभा तहकूब करण्यात आली.

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी भारताच्या सुप्रसिद्ध पार्श्वगायिका, स्वरसम्राज्ञी पद्मविभूषण आशालता गणपत भोसले यांच्या निधनाबाबत दुखवट्याबाबतचा विषय उपस्थित करत दुःख व्यक्त केले. भारताच्या संगीत विश्वातील एक तेजस्वी तारा, आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वरसम्राज्ञी आशाताई भोसले यांचे रविवार, १२ एप्रिल रोजी दुःखद निधन झाले. या घटनेचा उल्लेख करताना मला अत्यंत दुःख होत आहे. आपण स्वतः आशा भोसले यांच्या घरी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. तेथील शोकाकुल वातावरण पाहता, आपल्या भावना दाटून आल्या,” असे सांगतांना महापौर रितू तावडे यांचे डोळे पाणावले.

सभागृह नेते गणेश खणकर यांनी दिवंगत आशा भोसले यांच्या निधनाबाबतचा शोकप्रस्ताव सभागृहात मांडला. अभंगांतील ओतप्रोत भक्ती, प्रेमगीतातील अनुराग, शृंगारगीतातील मादकता, वीरगीतातील दुखरी वेदना, उडत्या गाण्यांतील खट्याळपणा अन् बिनधास्तपणा या समस्त भावना आपल्या आवाजातून, गाण्यातून कोट्यावधी गानरसिकांच्या हृदयापर्यंत थेट पोहोचवण्याची अद्भुत क्षमता असलेल्या ज्येष्ठ व श्रेष्ठ गायिका आशाताई भोसले यांनी रविवारी दुपारी जगाचा निरोप घेतला, असा उल्लेख करीत सभागृह नेते गणेश खणकर यांनी शोक व्यक्त केला.

यावेळी, विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनीही दिवंगत आशाताई भोसले यांना श्रद्धांजली अर्पित करताना जुन्या आठवणींना उजाळा देत आदरांजली वाहिली.

आशाताईंच्या स्मृत्यर्थ संगीत संस्था स्थापणार

आशा भोसले यांच्या संकल्पनेतील संगीत संस्था स्थापन करण्यासाठी सकारात्मक पावले उचलण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी    राज्य मंत्रिमंडळ बैठकीत दिली.

राज्य मंत्रिमंडळाच्या सोमवारच्या बैठकीत आशा भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्री उपस्थित होते. आशाताईंनी संगीत क्षेत्राशी निगडीत संस्था स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला होता. हा प्रस्ताव सरकार पुढे घेऊन जाईल. आशाताईंच्या संकल्पनेतील संस्था साकार व्हावी यासाठी सकारात्मक पावले उचलली जातील, असे फडणवीस यांनी यावेळी  सांगितले. बैठकीत मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी आशा भोसले यांच्या निधनाबद्दलचा शोकप्रस्ताव वाचून दाखविला.

अखेर गुन्हे मागे! CJP आंदोलकांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; ५ सप्टेंबरचा मोर्चा स्थगित

अतिक्रमणांवर हातोडा! मस्जिद बंदरच्या नंदलाल जानी मार्गावरील दुकाने, सिमेंट ओटे जमीनदोस्त; BMC च्या ‘बी’ वार्डाची तोडक कारवाई

Nepal Floods : नेपाळमधील मृतांचा आकडा एक हजारावर; जवळपास ४ हजार जण अद्याप बेपत्ता

OBC बैठकीतून तीन मंत्र्यांचा सभात्याग; भुजबळ, पाटील, राठोड आक्रमक

एस्सेल ग्रुपचे अध्यक्ष सुभाष चंद्राप्रकरणी तडजोडीला स्थगिती