Mumbai : स्व-गणना ॲम्बेसिडर म्हणून काम करावे; पालिका आयुक्तांचे कर्मचाऱ्यांना आवाहन 
मुंबई

Mumbai : स्व-गणना ॲम्बेसिडर म्हणून काम करावे; पालिका आयुक्तांचे कर्मचाऱ्यांना आवाहन

स्व-गणना प्रक्रियेचे सदिच्छादूत (ॲम्बेसिडर) म्हणून काम करावे तसेच मुंबईतील सार्वजनिक ठिकाणी, बस स्थानक, मेट्रो, रेल्वे स्थानक इत्यादी ठिकाणी स्व-गणेबाबत जनजागृती करावी, असे आवाहन मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी केले आहे.

Swapnil S

मुंबई : महानगरपालिका क्षेत्रात ‘जनगणना - २०२७’ अंतर्गत स्व-गणनेच्या पहिल्या टप्प्यातील प्रक्रिया प्रभावीपणे राबवावी. मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी स्व-गणना प्रक्रियेचे सदिच्छादूत (ॲम्बेसिडर) म्हणून काम करावे तसेच मुंबईतील सार्वजनिक ठिकाणी, बस स्थानक, मेट्रो, रेल्वे स्थानक इत्यादी ठिकाणी स्व-गणेबाबत जनजागृती करावी, असे आवाहन मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी केले आहे.

जनगणना २०२७ च्या कामकाजासाठी आवश्यक कर्मचारी संख्या आणि प्रशिक्षणाच्या कामकाजाचा आढावा बैठकीत घेण्यात आला. आतापर्यंत मुंबई शहर अंतर्गत २४ हजार २८५ आणि उपनगरात ४६ हजार ३७२ नागरिकांनी जनगणना २०२७ अंतर्गत स्वगणनेच्या प्रक्रियेत सहभाग नोंदवला आहे. मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये जनगणना - २०२७ च्या पहिल्या टप्प्याअंतर्गत १ ते १५ मे या कालावधीत स्व-गणना पार पडणार आहे. यानंतर घर यादी व घरगणनेची सुरुवात १६ मे ते १४ जून या कालावधीत होणार आहे.

पालिकेच्या यंत्रणेतील कर्मचाऱ्यांनी या प्रक्रियेचे ॲम्बेसेडर म्हणून जबाबदारी स्वीकारावी. पालिकेच्या नागरी सुविधा केंद्र (सीएफसी), विविध आस्थापना कार्यालये, प्रशासकीय विभाग कार्यालये याठिकाणी स्व-गणनेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यासाठी व्यापक जनजागृती करण्यात यावी. व्यापक जनजागृती माध्यमातून स्व-गणनेच्या प्रक्रियेत अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयुक्त अश्विनी भिडे यांनी केले. उपायुक्त व प्रशासकीय विभागाचे सहायक आयुक्त यांनी अधिकाधिक कर्मचारी स्वगणनेच्या प्रक्रियेत सहभागी होतील, यादृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

नागरिकांपर्यंत लिंक पोहोचवा!

जनगणना-२०२७ अंतर्गत स्व-गणनेची माहिती डिजिटल स्वरूपात भरण्यासाठी स्व-गणनेसंदर्भातील संकेतस्थळाची लिंक अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी गरज आहे. यासाठी समाजमाध्यमांसह विविध माध्यमांचा प्रभावीपणे वापर करावा तसेच सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या ठिकाणीही जनजागृतीसाठी अधिकाधिक प्राधान्य देण्यात यावे. आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून आरोग्य सेविकांच्या मदतीने स्व-गणनेची लिंक अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचनाही आयुक्तांनी दिल्या.

SRA कायद्याचे ऑडिट करा, तज्ज्ञ समिती नेमा! हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश

Mumbai : देवनार पशुवधगृहात बकरी ईद सणासाठी पालिकेच्या सोयीसुविधा; म्हैस, बकऱ्यांच्या बाजाराचे आयोजन

प्राणी गणनेत जळगाव जिल्ह्यात तीन वाघांचे दर्शन; वढोदा-चारठाणा परिसरातील 'बनाना टायगर' क्षेत्र पुन्हा चर्चेत

व्यापार करार अधांतरी! भारत-अमेरिका व्यापार चर्चेचा वेग मंदावण्याची शक्यता

मुंबई विभागातील १ हजार ४६१ शाळांचा निकाल १०० टक्के; सर्वाधिक ५९५ शाळा; ठाण्यात ४४२ शाळांची उल्लेखनीय कामगिरी