Mumbai : वांद्र्यात 'तिरंगा मार्च'वर कारवाई; अभिनेते अमीन हाजी यांच्यासह अनेक जण ताब्यात 
मुंबई

Mumbai : वांद्र्यात 'तिरंगा मार्च'वर कारवाई; अभिनेते अमीन हाजी यांच्यासह अनेक जण ताब्यात

दिल्लीत सीजेपीच्या सौरभ दास, आशुतोष रांका आणि इतर आंदोलकांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी रविवारी वांद्रे पश्चिम येथील कार्टर रोडवर तिरंगा मार्च काढण्यात आला. यावेळी जमलेल्या आंदोलकांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले. हा मार्च कोणतीही परवानगी न घेता आयोजित करण्यात आला होता.

Swapnil S

मेघा कुचिक/मुंबई

दिल्लीत सीजेपीच्या सौरभ दास, आशुतोष रांका आणि इतर आंदोलकांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी रविवारी वांद्रे पश्चिम येथील कार्टर रोडवर तिरंगा मार्च काढण्यात आला. यावेळी जमलेल्या आंदोलकांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले. हा मार्च कोणतीही परवानगी न घेता आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळी पोहोचणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेतले. दरम्यान, निदर्शनांमध्ये सहभागी होण्यासाठी कार्टर रोडवर पोहोचलेल्या अभिनेते अमीन हाजी यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.

मुंबई पोलिसांनी या मार्चला परवानगी नाकारली होती. असे असतानाही 'कॉकरोच जनता पार्टी' (सीजेपी)चे काही समर्थक निदर्शनांमध्ये सहभागी होण्यासाठी कार्टर रोडवर पोहोचले. पोलिसांनी कार्टर रोडवर आलेल्या आंदोलकांना ताब्यात घेतले, तर काहींना नजरकैदेत ठेवण्यात आल्याचे वृत्त आहे. निदर्शनांमध्ये सहभागी होण्यासाठी कार्टर रोडवर पोहोचलेल्या अभिनेते अमीन हाजी यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच सीजेपीने आयोजित केलेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी प्रवास करत असताना सामाजिक कार्यकर्त्या आणि आप नेत्या अंजली दमानिया यांना शनिवारी खार सबवे जवळ पोलिसांनी ताब्यात घेतले होते. निदर्शनांना परवानगी नाकारल्यामुळे पोलिसांनी परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला होता.

वाहतुकीसाठी दुसरी मार्गिका खुली

कार्टर रोडच्या एका बाजूला बॅरिकेट्स लावण्यात आले होते, तर दुसरी लेन वाहतुकीसाठी खुली ठेवण्यात आली होती. मात्र, १०० पेक्षा कमी आंदोलक घटनास्थळी पोहोचल्याने प्रतिसाद कमी मिळाला. पोलिसांनी केलेल्या कारवाई आणि अल्प प्रतिसादामुळे हा मार्च नियोजित वेळेनुसार पुढे जाऊ शकला नाही. त्यानंतर पोलिसांनी परिसरातील बॅरिकेट्स काढून घेतले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

७२ पेक्षाही २०२६ चा दुष्काळ कठीण; सप्टेंबरमध्येच आटले जलस्रोत; यंदा पुनर्भरणच नाही

रत्नागिरीकरांना पावसाचा दिलासा! देवरुख परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार सरी

महाराष्ट्र FDA करणार कर्नाटक मॉडेलचा अभ्यास; औषधांची खरेदी किंमत नमूद करण्यासाठी पडताळणी

कंत्राटदारांचे आज आंदोलन; राज्य सरकारकडे ८६ हजार कोटी थकले

Mumbai : हुश्श! उष्णतेच्या लाटेपासून दिलासा; कुलाबा, अंधेरी, भांडुपमध्ये सर्वाधिक खराब हवा