प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

Mumbai : वांद्रे येथे विनापरवानगी २५० ड्रोन्स उडवले; दोघांवर गुन्हा दाखल

मुंबईतील वांद्रे पश्चिम भागात सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून विनापरवानगी तब्बल २०० ते २५० ड्रोन्स उडवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी दोघा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एका खासगी कंपनीच्या जाहिरात मोहिमेसाठी या ड्रोन्सचा वापर केला जात असल्याचा तपास समोर आला आहे.

प्रतिनिधी

मेघा कुचिक/मुंबई

वांद्रे पश्चिम येथील ‘विंग स्पोर्ट्स क्लब’च्या मैदानावर २८ मे रोजी रात्री २५० च्या आसपास ड्रोन्स उडवून चित्रीकरण सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ड्रोन्स खाली उतरवण्याचे आदेश दिले. प्राथमिक चौकशीत हे ड्रोन्स बोल्डसन मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून जाहिरात आणि प्रसिद्धीसाठी वापरले जात असल्याचे उघड झाले. यातील प्रत्येक ड्रोनची किंमत सुमारे ८० हजार आहे. या संपूर्ण प्रक्रियेच्या चित्रीकरण व नियंत्रणासाठी ड्रोन कॅमेरे आणि लॅपटॉपचा वापर केला जात होता. दरम्यान, सुनील गुप्ता आणि कंपनीचे व्यवस्थापक गोपाल सिंह (४५) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणी प्राध्यापक निलंबित; 'त्या' निवेदनावरून संस्थेची माफी

Mumbai : ‘बटरफ्लाय’ रोखणार पाणी गळती; जलवाहिन्यांवर बटरफ्लाय झडपा बसवणार, गणेश खणकर यांच्या मागणीची दखल

Mumbai : चौपाटी, विसर्जनस्थळी चोख व्यवस्थापन; देशभरातील तज्ज्ञांकडून पालिका, पोलिसांचे कौतुक

गणेश विसर्जनासाठी BMC सज्ज; ३८३ कृत्रिम तलावांची व्यवस्था, ६७ नैसर्गिक विसर्जनस्थळांवरही सुविधा, २५ हजार अधिकारी-कर्मचारी तैनात

बार्सिलोनामध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’; महाराष्ट्र मंडळ स्पेनतर्फे गणेशोत्सव, स्पॅनिश कलाकारांचाही सहभाग