Mumbai : पालिकेच्या ३९० कनिष्ठ अभियंता भरतीचा मार्ग मोकळा; भरती प्रक्रियेला मिळणार गती 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

Mumbai : पालिकेच्या ३९० कनिष्ठ अभियंता भरतीचा मार्ग मोकळा; भरती प्रक्रियेला मिळणार गती

मुंबई महापालिकेच्या तब्बल ३९० कनिष्ठ अभियंता पदांच्या भरतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. या भरती प्रक्रियेविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्याने गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या भरती प्रक्रियेला आता गती मिळण्याची शक्यता आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबई महापालिकेच्या तब्बल ३९० कनिष्ठ अभियंता पदांच्या भरतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. या भरती प्रक्रियेविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्याने गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या भरती प्रक्रियेला आता गती मिळण्याची शक्यता आहे.

महापालिका विधी समितीच्या अध्यक्षा दीक्षा कारकर यांनी भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले आहे. दरम्यान, दीर्घकाळापासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

महापालिकेच्या नगर अभियंता मध्यवर्ती खात्याने कनिष्ठ अभियंता (सिव्हिल, मॅकेनिकल आणि इलेक्ट्रिकल) पदांसाठी २५ नोव्हेंबर २०२४ रोजी अर्ज मागवले होते. त्यानंतर पात्र उमेदवारांची परीक्षा घेण्यात आली. मात्र परीक्षा होऊन वर्ष उलटूनही निकाल जाहीर न झाल्याने उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. भरती प्रक्रियेला आव्हान देत आकाश देशमुख आणि इतर विरुद्ध मुंबई महानगरपालिका या प्रकरणात रिट पिटीशन क्र. १८०५२/२०२४ दाखल करण्यात आली होती.

अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा

भरती प्रक्रिया नियमानुसार तातडीने पूर्ण करण्यात यावी, यासाठी उमेदवारांनी विधी समितीच्या अध्यक्षा दीक्षा कारकर यांची भेट घेऊन पाठपुरावा करण्याची मागणी केली होती. त्यानंतर कारकर यांनी या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करत पालिका आयुक्त अश्विनी भिडे, सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त किशोर गांधी, नगर अभियंता रामचंद्र कदम, विधी अधिकारी कोमल पंजाबी तसेच अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे पाठपुरावा केला.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : लालबागच्या राजाच्या प्रसादातून वीज निर्मिती; ४२ टन ओला कचरा जैविक प्रक्रियेत, रुग्णालयातील वॉर्डला मिळणार वीज

आंतरराष्ट्रीय स्तरावर रोजगाराच्या संधी उपलब्ध करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

Mumbai : पालिका शाळांत आता रोबोटिक्सचे धडे; IIT मुंबईच्या मदतीने तंत्रज्ञानाचे शिक्षण, ५० शिक्षक-अधिकाऱ्यांचा अभ्यास दौरा

AI बनतोय मुलांचा शिक्षण सहाय्यक; 'क्राय' संस्थेच्या सर्वेक्षणातील निष्कर्ष

खंडणी प्रकरणात निलेश घायवळसह सर्व आरोपी निर्दोष