मुंबई

BMC Election : डॉक्टर, वकील, इंजिनिअरही निवडणुकीच्या रिंगणात! बीएड, संगणक अभियंताही निवडणुकीचे उमेदवार

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत डॉक्टर, वकील, इंजिनिअर असे उच्च शिक्षित उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यात अपक्ष उमेदवारांसह सर्वच राजकीय पक्षातील उमेदवारांचा समावेश आहे. शिक्षण ही काळाची गरज असून उच्च शिक्षित लोकप्रतिनिधी असल्यास अपल्या प्रभागातील समस्यांचे निवारण होण्यास अधिक काळ जाणार नाही, असा विश्वास मतदारांनी व्यक्त केला.

Swapnil S

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत डॉक्टर, वकील, इंजिनिअर असे उच्च शिक्षित उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यात अपक्ष उमेदवारांसह सर्वच राजकीय पक्षातील उमेदवारांचा समावेश आहे. शिक्षण ही काळाची गरज असून उच्च शिक्षित लोकप्रतिनिधी असल्यास अपल्या प्रभागातील समस्यांचे निवारण होण्यास अधिक काळ जाणार नाही, असा विश्वास मतदारांनी व्यक्त केला.

प्रमुख डॉक्टर उमेदवारांमध्ये नरेंद्र कुमार शर्मा (एमबीबीएस, एमडी), शिल्पा सांगोरे (एमबीबीएस, डीसीएच), अविनाश संख्ये (एमबीबीएस), आदिती भास्कर खुरसंगे (बीडीए)यांचा समावेश आहे. प्रभाग २२७ मधून गौरवी शिवलकर (बीडीएस) आणि डिसोझा लोरा तिमोठी (एमबीबीएस+डीप्लोमा यांचा सहभाग लक्षवेधी आहे. प्रभाग ८८ मधून प्रज्ञा सामंत (बीएएमएस, पदव्युत्तर- संस्कृत व योगशास्त्र) या लढत आहेत. तसेच प्रभाग १५७ मधून डॉ. सरिता म्हस्के (बीएचएमएस), प्रभाग १६३ मधून डॉ. शहाणा बेगम सय्यद (बीएएमएस), प्रभाग १६७ मधून समान आजमी (बीएचएमएस) आणि प्रभाग १६८ मधून डॉ. सईदा आरिफ खान (एमडी, डीएनबी, डीएएमबीबीएस) व अनुराधा पेडणेकर (वैद्यकीय पदवीधर) यांनी निवडणुकीत आपले पाऊल टाकले आहे.

प्रभाग १६८ आणि २२७ हे प्रभाग डॉक्टर उमेदवारांसाठी महत्त्वाचे मानले जात आहेत. प्रभागांत एकापेक्षा जास्त वैद्यकीय व्यावसायिक निवडणुकीत उतरले आहेत.

महापालिकेच्या निवडणूक रिंगणात यावेळी मोठ्या संख्येने उच्चशिक्षित उमेदवार व व्यावसायिक उतरले आहेत. डॉक्टर, इंजिनिअर, वकील, शिक्षक यासह उच्च शिक्षण घेतलेले अनेक जण आपले नशीब आजमावण्यासाठी निवडणूक लढवत आहेत.

समाजवादी पक्षाचे ७१ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामधील सात महिला उमेदवार बीए बीएड झालेल्या शिक्षिका आहेत. ५ उमेदवार डॉक्टर आहेत त्यामध्ये ३ महिला व २ पुरुष उमेदवारांचा समावेश आहे. १२ उमेदवार पदवीधर आहेत. याशिवाय तीन उमेदवार वकील असून त्यामध्ये १ महिला वकील व २ पुरुष वकिलांचा समावेश आहे. २ महिला उमेदवार एमबीए आहेत. ३ उमेदवार इंजिनिअर आहेत, तर १ महिला उमेदवार पदव्युत्तर पदवीप्राप्त आहे व एक महिला उमेदवार संगणक अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर पदवी घेऊन डॉक्टरेट केलेली आहे.

"विद्यार्थ्यांची माफी मागा"; दिल्ली आंदोलनातील लाठीचार्जवरून राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल

Ashadhi Ekadashi 2026 : विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर! दादर–पंढरपूर विशेष रेल्वे, पाहा वेळापत्रक

'जो भुकेला आहे त्याला द्या'; मुंबईतील तरुणाने जंतर-मंतरवरील आंदोलनकर्त्यांसाठी झोमॅटोवरून पाठवलं मोफत जेवण; Video

Pune Metro Line 3 : व्हॉट्सॲपवर QR तिकीट, UPI पेमेंटपासून NCMC कार्डपर्यंत; पुणे मेट्रो प्रवाशांसाठी 'या' नव्या सुविधा

"पोलिसांनी संयम दाखवला, अन्यथा..."; दिल्ली आंदोलनावर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया