BMC Gen Z Fellowship 2026 : पालिकेच्या कारभारात आता Gen Z चा सहभाग! ५० तरुणांना मिळणार कामाची संधी, कसं कराल अप्लाय? 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

BMC Gen Z Fellowship 2026 : पालिकेच्या कारभारात आता Gen Z चा सहभाग! ५० तरुणांना मिळणार कामाची संधी, कसं कराल अप्लाय?

या फेलोशिपसाठी एकूण ५० जागा असून, निवड झालेल्या उमेदवारांना ६१,५०० रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे.

Mayuri Gawade

मुंबई : सध्या सोशल मीडिया, शिक्षण, नोकरी आणि स्टार्टअपपासून राजकारणापर्यंत सर्वच क्षेत्रांत 'जेन झी' हा चर्चेचा विषय ठरत आहे. आता याच जेन झींची एंट्री थेट मुंबई महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजात होणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने 'BMC Gen Z Fellowship Programme 2026' जाहीर केले असून, या माध्यमातून तरुण पदवीधरांना मुंबईचा कारभार जवळून समजून घेण्यासोबतच शहराच्या विकासाशी संबंधित उपक्रमांमध्ये प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळणार आहे. या फेलोशिपसाठी एकूण ५० जागा असून, निवड झालेल्या उमेदवारांना ६१,५०० रुपये विद्यावेतन देखील दिले जाणार आहे.

महापालिकेने सोशल मीडियावर या उपक्रमाची घोषणा करत "विकसित मुंबईच्या निर्मितीसाठी युवा पिढीला सुवर्णसंधी! BMC GEN Z FELLOWSHIP PROGRAM" असा संदेश दिला आहे.

BMC Gen Z Fellowship म्हणजे काय?

या फेलोशिपच्या माध्यमातून तरुणांना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासकीय कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे. त्याचबरोबर मुंबईच्या भविष्यातील विकासाशी संबंधित विविध उपक्रमांमध्ये योगदान देण्याची संधीही दिली जाणार आहे. यातून निवड झालेल्या उमेदवारांना शिक्षण, नेतृत्व आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांचा अनुभव मिळेल. तसेच धोरणकर्त्यांशी संवाद साधण्याची संधीही उपलब्ध होणार आहे.

फेलोशिपमध्ये काय मिळणार?

निवड झालेल्या उमेदवारांना पुढील संधी मिळतील :

  • शिक्षण, नेतृत्व आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांचा प्रत्यक्ष अनुभव

  • बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासकीय कामकाजाची माहिती

  • धोरणकर्त्यांशी संवाद साधण्याची संधी

  • नेतृत्व आणि संवादकौशल्य विकसित करण्याची संधी

  • मुंबईच्या भविष्यातील विकासाशी संबंधित उपक्रमांमध्ये सहभाग

  • फेलोशिप यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र

कोण करू शकतो अर्ज?

या फेलोशिपसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी निर्धारित पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे.

  • उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.

  • त्याला मराठी भाषा वाचता, लिहिता आणि बोलता येणे आवश्यक आहे.

  • हिंदी आणि इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान असणेही गरजेचे आहे.

  • कंप्युटर आणि इंटरनेट वापरण्याचे मूलभूत ज्ञान आवश्यक आहे.

  • उमेदवाराचे वय २८ वर्षांपेक्षा कमी असावे.

५० जागा, फेलोशिपचा कालावधी १२ महिने

'BMC Gen Z Fellowship Programme 2026'अंतर्गत एकूण ५० उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

एकूण जागा : ५०
विद्यावेतन : ६१,५०० रुपये
कालावधी : १२ महिने
अर्ज शुल्क : ५०० रुपये

अर्जासाठी किती दिवसांची मुदत?

या फेलोशिपसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया १९ ऑगस्ट २०२६ पासून सुरू झाली आहे. पात्र उमेदवारांना ३१ ऑगस्ट २०२६पर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्ज करताना उमेदवारांनी पात्रतेच्या सर्व अटी काळजीपूर्वक तपासाव्यात आणि अर्जातील माहिती अचूक भरावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

अर्ज कसा कराल?

पात्र उमेदवारांना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://bmc.recruitlive.in/#/login  या अधिकृत भरती पोर्टलवरून ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

अर्ज करताना आवश्यक वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती भरून निर्धारित मुदतीत अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. अर्ज सबमिट करण्यापूर्वी दिलेली सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करून घेणे आवश्यक आहे.

महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासोबतच मुंबईच्या विकासाशी संबंधित उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी या फेलोशिपमधून तरुणांना मिळणार आहे. त्यामुळे प्रशासन, नेतृत्व, संवाद आणि शहरी विकासाच्या क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही फेलोशिप महत्त्वाची संधी ठरू शकते.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

नऊ वर्षांत ४४७ प्रवासी 'नो फ्लाय लिस्ट'मध्ये; विमानात गोंधळ घालणाऱ्यांवर DGCA ची कठोर कारवाई

शाळा, कॉलेज, रुग्णालय परिसरातून भटके कुत्रे हद्दपार; शेल्टरसाठी मुंबई बाहेरील जागेची पालिकेकडून चाचपणी

पुणे पुन्हा हादरले! जुन्नरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून; मुलीचा शोध घेण्याचा आरोपीने केला बनाव

Mumbai : ६३८ आस्थापनांना न्यायालयात खेचले; मराठी पाट्यांकडे दुर्लक्ष भोवले; शॉपिंग मॉल, नामांकित आस्थापना रडारवर

BMC सफाई कर्मचाऱ्यांच्या मोफत घरांचा प्रश्न ऐरणीवर; उपलब्ध जमिनीचा विस्तृत तपशील सादर करण्याचे हायकोर्टाचे आदेश