मुंबई महापालिका संग्रहित छायाचित्र
मुंबई

Mumbai : सभागृहाबाहेर डॉक्टर कधी तैनात करणार? स्थायी समितीत सभागृह नेत्यांचा सवाल

मार्च २०२२ पासून नगरसेवक नसल्याने सभागृह, समिती अध्यक्षांच्या दालनाची दुरवस्था झाली आहे. मुंबई महापालिकेत नगरसेवक निवडून आल्यानंतर सभागृहातील साऊंड सिस्टीम बदलावी, अशी सूचना करूनही प्रशासन दुर्लक्ष करत आहे. आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या सभागृहातील लटकते माईक मुंबईकरांना दाखवणार का, असा सवाल सभागृह नेते गणेश खणकर यांनी बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत उपस्थित केला.

Swapnil S

मुंबई : मार्च २०२२ पासून नगरसेवक नसल्याने सभागृह, समिती अध्यक्षांच्या दालनाची दुरवस्था झाली आहे. मुंबई महापालिकेत नगरसेवक निवडून आल्यानंतर सभागृहातील साऊंड सिस्टीम बदलावी, अशी सूचना करूनही प्रशासन दुर्लक्ष करत आहे. आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या सभागृहातील लटकते माईक मुंबईकरांना दाखवणार का, असा सवाल सभागृह नेते गणेश खणकर यांनी बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत उपस्थित केला. अनेक नगरसेवकांना डायबिटीस आहे, त्यामुळे सभागृहाबाहेर डॉक्टर तैनात करण्यात यावे, अशी मागणी केली होती. मात्र अद्याप डॉक्टर तैनात करण्यात आलेले नाही, अशी नाराजी खणकर यांनी व्यक्त केली.

सभागृहातील माईक सिस्टीम सुधारण्यासाठी सभागृह नेते गणेश खणकर प्रयत्न करत आहेत. मात्र तीन महिने उलटले तरी काहीच बदल करण्यात आलेला नाही, असा मुद्दा ठाकरे सेनेचे नगरसेवक यशोधर फणसे यांनी उपस्थित केला. सभागृहात जागा अपुरी पडते याबाबत अनेकदा प्रशासनाला जाब विचारला. सभागृह, समिती अध्यक्ष, प्रभाग समिती अध्यक्षांच्या दालनाची दुरवस्था झाली आहे. आता नवीन माईक सिस्टीम बसवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला असून १ कोटी १ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे‌. प्रशासन निविदा आणणार आणि मंजूर करायला बसलो काय, असा सवाल खणकर यांनी उपस्थित केला.

लवकर कार्यवाही करावी!

सभागृहाबाहेर डॉक्टर नाही, साऊंड सिस्टीम जुनीच त्यामुळे यशोधर फणसे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याला पाठिंबा असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असे काँग्रेसचे गटनेते आश्रफ आजमी म्हणाले. दरम्यान, स्थायी समितीत सदस्यांच्या भावना लक्षात घ्याव्यात, आयुक्तांनी सदस्यांनी उपस्थित केलेले मुद्दे गांभीर्याने घ्यावे आणि लवकरात लवकर कार्यवाही करावी, असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी देत प्रस्ताव संमत करण्यात आल्याचे स्पष्ट केले.

Mumbai : महापौरांचा पती असल्याचे सांगत शिक्षकाच्या फोटोचा गैरवापर; बदनामीकारक यूट्यूब व्हिडीओप्रकरणी FIR दाखल

Mumbai : चेंबूरमध्ये धक्कादायक प्रकार! चारित्र्यावर संशय घेत गर्भवती प्रेयसीचा काढला काटा; प्रियकराला अटक

Video : चुकून लेडीज डब्यात चढला; धावत्या लोकलमधून उडी मारणार इतक्यात...

Navi Mumbai : रबाळे एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग; परिसरात धुराचे लोट, Video

शक्तिपीठ महामार्गासाठी भूसंपादनाला मिळाली गती; शेतकऱ्यांचा विश्वास जिंकण्यासाठी कार्यशाळांचे आयोजन