मुंबई

Mumbai : ठाकरेंची दोन बाद मते भाजपच्या पथ्यावर; एस, टी प्रभाग समितीत भाजपसाठी देव धावला; अध्यक्षपदी भाजपच्या साक्षी दळवी

कुर्ला एल. विभाग, घाटकोपर, टी. व एस. प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी सोमवारी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत एस व टी प्रभागात उद्धव ठाकरे सेनेचे उमेदवार सुरेश शिंदे व ठाकरे सेनेच्या नगरसेविका दिपमाला बढे यांनी चुकीच्या पद्धतीने स्वाक्षरी केल्याने ते दोघांची मते बाद झाली. त्यामुळे भाजपच्या साक्षी दळवी अध्यक्षपदी निवडून आल्या. दरम्यान, १७ प्रभाग समिती पैकी ९ प्रभाग समितीवर भाजपचा वरचष्मा राहिला आहे.

Swapnil S

मुंबई : कुर्ला एल. विभाग, घाटकोपर, टी. व एस. प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी सोमवारी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत एस व टी प्रभागात उद्धव ठाकरे सेनेचे उमेदवार सुरेश शिंदे व ठाकरे सेनेच्या नगरसेविका दिपमाला बढे यांनी चुकीच्या पद्धतीने स्वाक्षरी केल्याने ते दोघांची मते बाद झाली. त्यामुळे भाजपच्या साक्षी दळवी अध्यक्षपदी निवडून आल्या. दरम्यान, १७ प्रभाग समिती पैकी ९ प्रभाग समितीवर भाजपचा वरचष्मा राहिला आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या अंतिम टप्प्यातील पाच प्रभाग समिती अध्यक्ष पदाच्या निवडणूक सोमवारी महापौर रितू तावडे व उपमहापौर संजय घाडी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडल्या. गोवंडी एम पूर्व विभागात एमआयएमच्या खैरनुसा अकबर हुसेन यांच्यासह शिवसेनेच्या प्रज्ञा सदाफुले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अखेर या निवडणुकीत एमआयएमच्या खैरनुसा अकबर हुसेन अपेक्षेनुसार विजयी झाल्या.

मुलुंड टी विभाग व भांडुप एस विभाग प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप, शिवसेना महायुतीचे १०, तर शिवसेना ठाकरे गट काँग्रेस व मनसेच्या एकूण १० नगरसेवकांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. मात्र ठाकरे गटाच्या ८ पैकी २ नगरसेवकांची मते बाद ठरली. त्यामुळे साक्षी दळवी यांना १० तर शिवसेना ठाकरे गटाची सुरेश शिंदे यांना ८ मते पडली. त्यामुळे भाजपच्या साक्षी दळवी यांना विजयी घोषित करण्यात आले. या निवडणुकीत शिवसेना ठाकरे पक्षाची दोन मते बाद ठरल्यामुळे ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

ठाकरेंच्या उमेदवाराचे मत बाद

एस व टी प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सुरेश शिंदे यांच्यासह ठाकरेंच्या दीपमाला बढे यांचे मत बाद ठरले. या दोघांनी आपल्या सह्या स्वतःच्या कॉलममध्ये न करता साक्षी दळवी यांच्या कॉलममध्ये केल्या. त्यामुळे त्यांची मते बाद ठरवण्यात आली.

तीन प्रभागात अध्यक्षाची बिनविरोध निवड !

कुर्ला एल विभाग प्रभाग समितीसह घाटकोपर एन विभाग व चेंबूर एम पश्चिम विभागात एकच उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यामुळे एन विभागात भाजपच्या अश्विनी मते, एल विभागात शिवसेनेचे विजेेंयंद्र शिंदे व एम पश्चिम विभागात भाजपच्या आशा मराठे बिनविरोध निवडून आल्या.

१७ प्रभाग समितीतील अध्यक्ष

  • भाजप

के पश्चिम - रोहन राठोड

के/दक्षिण व के/उत्तर - प्रकाश मुसळे

पी दक्षिण - श्रीकला पिल्ले

उत्तर व आर मध्य - प्रकाश दरेकर,

आर दक्षिण - लीना देहरकर

सीव डी - आकाश पुरोहित

एम पश्चिम - आशा मराठे

एन - अश्विनी मते

एस व टी - साक्षी दळवी

  • शिवसेना

एफ उत्तर व एक दक्षिण - मानसी सातमकर

एल - विजेंयंद्र शिंदे

  • शिवसेना ठाकरे गट

जी दक्षिण - पद्मजा चेंबूरकर

एच/पूर्व व एच/पश्चिम - रोहिणी कांबळे

  • काँग्रेस

ए,बी,ई - ज्ञानराज निकम

पी पूर्व व पी पश्चिम - हैदरअली अस्लम शेख

  • एमआयएम

एम पूर्व - खैरनुसा अकबर हुसेन

  • मनसे

दादर जी उत्तर - यशवंत किल्लेदार

"६ जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा, अनावश्यक प्रवास टाळा"; मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना आवाहन

Telegram ला केंद्र सरकारची नोटीस; बेकायदेशीर चित्रपट आणि ओटीटी कंटेंटवर कारवाईचे निर्देश

Mumbai Rain : पावसाचा जोर कायम; मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत

Mumbai Rain : मुसळधार पावसाने मुंबईची दाणादाण; अनेक भाग जलमय, वसई-विरारलाही फटका, Video

जोगेश्वरीत भरधाव टँकरने डिलिव्हरी बॉयला चिरडलं; पळ काढणाऱ्या चालकाला नागरिकांनी केलं पोलिसांच्या हवाली, Video