सृष्टी विशाल तुली, आदित्य ऋषिकेश पंडित (डावीकडून) 
मुंबई

एअर इंडियाच्या पायलट तरुणीचा मृतदेह सापडला; प्रियकराने मानसिक त्रास दिल्याचा आरोप

नॉन व्हेज खाण्यावरुन हाणेार्‍या वादाला कंटाळून सृष्टी विशाल तुली या २५ वर्षांच्या एअर इंडियामध्ये पायलट तरुणीने तिच्या अंधेरीतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी तिच्या दिल्लीतील प्रियकर आदित्य ऋषिकेश पंडित (२७) याला पवई पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला अंधेरीतील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

Swapnil S

मुंबई : नॉन व्हेज खाण्यावरुन हाणेार्‍या वादाला कंटाळून सृष्टी विशाल तुली या २५ वर्षांच्या एअर इंडियामध्ये पायलट तरुणीने तिच्या अंधेरीतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी तिच्या दिल्लीतील प्रियकर आदित्य ऋषिकेश पंडित (२७) याला पवई पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला अंधेरीतील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

सृष्टी ही मूळची उत्तर प्रदेशची गोरखपूर येथील तर आदित्य हा दिल्लीचा रहिवाशी आहे. सृष्टीने सीपीएलचे प्रशिक्षण घेतले होते. त्यानंतर तिची एअर इंडियामध्ये पायलट म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. गेल्या जून महिन्यांपासून ती मुंबईत वास्तव्यास होती. तिने अंधेरीतील कनाकिया रेन फॉरेस्ट अपार्टमेंटमध्ये फ्लॅट भाड्याने घेतला होता.

तिला शिवीगाळ करून अपमानास्पद वागणूक देत होता. तसेच तिचे मानसिक शोषण करत होता. त्यांच्यातील वाद विकोपास गेले होते. त्यातून सृष्टी ही मानसिक तणावात होती. याच मानसिक नैराश्यातून तिने सोमवारी तिच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ही माहिती तिचे चुलते विवेककुमार नरेंद्रकुमार तुली यांना समजताच ते नातेवाईकांसोबत मुंबईत आले. त्यानंतर त्यांनी सृष्टीच्या मित्रांशी चर्चा केली. त्यातून त्यांना आदित्यकडून सृष्टीचा होणारा याबाबत माहिती समजली. त्याच्यामुळेच तिने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे त्यांनी आदित्यविरुद्ध पवई पोलिसांत तक्रार केली होती. तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी सृष्टीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. याच गुन्ह्यांत त्याला मंगळवारी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला मंगळवारी दुपारी अंधेरीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

खाण्यावरून खटके

पायलट असलेली सृष्टी विशाल तुली व आदित्य ऋषिकेश पंडित यांच्यात गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. सृष्टी ही तेव्हापासूनच आदित्यच्या संपर्कात होती. आदित्य हा पालयटचे प्रशिक्षण घेत होता. ओळखीनंतर

या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते. त्यांच्यात नॉन व्हेज खाण्यावरून नेहमीच खटके उडत होते. ही बाब सृष्टीला मानसिक त्रास होण्यापऱ्यंत गेली.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक