धावत्या लोकल ट्रेनमधून पडून मृत्यू झालेल्या तरुणाच्या पालकांना ८ लाखांची भरपाई - हायकोर्ट (संग्रहित छायाचित्र)
मुंबई

Mumbai : धावत्या लोकल ट्रेनमधून पडून मृत्यू झालेल्या तरुणाच्या पालकांना ८ लाखांची भरपाई - हायकोर्ट

धावत्या लोकल ट्रेनमधून पडून मृत्यू झालेल्या तरुणाच्या पालकांना दिलासा देत उच्च न्यायालयाने ८.१४ लाख रुपयांची भरपाई मंजूर केली.

Swapnil S

मुंबई : धावत्या लोकल ट्रेनमधून पडून मृत्यू झालेल्या तरुणाच्या पालकांना दिलासा देत उच्च न्यायालयाने ८.१४ लाख रुपयांची भरपाई मंजूर केली. रेल्वे प्रशासनाने ही भरपाईची रक्कम पुढील आठ आठवड्यांत द्यावी, असे आदेश न्यायमूर्ती आरती साठे यांनी दिले. याचवेळी न्यायालयाने रेल्वे न्यायाधिकरणाचा जुना निर्णय रद्द केला.

२२ मार्च २०१५ रोजी राहुल सूर्यवंशी हा तरुण घणसोली रेल्वे स्थानकावरून ऐरोलीकडे जाण्यासाठी लोकल ट्रेनमध्ये चढला होता. घणसोली आणि रबाळे स्थानकांदरम्यान धावत्या लोकल ट्रेनमधून अचानक खाली पडल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. राहुल हा एमआयडीसीमध्ये कार्यरत होता आणि कुटुंबातील एकमेव कमावता व्यक्ती होता. अपघातानंतर राहुलच्या आई-वडिलांनी रेल्वे न्यायाधिकरणाकडे भरपाईसाठी अर्ज केला होता. मात्र, रेल्वे प्रशासनाने डीआरएम अहवालाचा हवाला देत राहुल ट्रेनमधून पडला नसल्याचा दावा केला.

राहुलचा मृत्यू रेल्वे रूळ ओलांडताना ट्रेनची धडक बसून झाल्याचे म्हणणे रेल्वे प्रशासनाने मांडले. रेल्वेचा हा दावा सप्टेंबर २०१९ मध्ये रेल्वे न्यायाधिकरणाने ग्राह्य धरला आणि वृद्ध पालकांचा भरपाईचा अर्ज फेटाळला होता. न्यायाधिकरणाच्या त्या निर्णयाविरोधात वृद्ध पालकांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले. त्यांच्या अपिलावर सुनावणी करताना न्यायमूर्ती आरती साठे यांनी मृत तरुणाच्या वृद्ध आई-वडिलांना ८,१४,६४१ रुपये भरपाई देण्याचे आदेश रेल्वे प्रशासनाला दिले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

दुष्काळाचा तिजोरीवर भार! शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारची कर्ज उभारण्याची तयारी

महाराष्ट्र SIR : तातडीची सुनावणी नाही, पुढील तारीख २२ ऑक्टोबर

...तर वाहतूक दंड वीज बिलात समाविष्ट; सुप्रीम कोर्टाची सूचना

काँग्रेसची देशभर निदर्शने; आग्र्यात ज्ञानेश कुमारांच्या घराला फासले काळे

BEST चे धाबे दणाणले; धारावीत वीजपुरवठ्यासाठी बड्या कंपनीचा अर्ज