Photo : X (@LiveLawIndia)
मुंबई

‘जॉली एलएलबी ३’ विरोधातील याचिका फेटाळली; आमच्याबद्दल काळजी करू नका - न्यायालय

अभिनेता अक्षय कुमार आणि अरशद वारसी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'जॉली एलएलबी ३' या कोर्टरूम ड्रामा सिनेमाविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळली.

Swapnil S

मुंबई : अभिनेता अक्षय कुमार आणि अरशद वारसी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'जॉली एलएलबी ३' या कोर्टरूम ड्रामा सिनेमाविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळली.

याचिकेत न्यायाधीश आणि वकिलांची चेष्टा करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र आमच्याबद्दल काळजी करू नका, असे न्यायालयाने सांगितले.

‘असोसिएशन फॉर एडिंग जस्टीस’ संस्थेने वकील चंद्रकांत गायकवाड यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली होती. या सिनेमाच्या प्रदर्शनाला स्थगिती द्यावी तसेच ‘भाई वकील है’ हे गाणे हटवावे, अशी मागणी याचिकेत केली होती.

याचिकादारांच्या म्हणण्यानुसार, चित्रपटात वकिलांबरोबरच न्यायाधीशांचीही चेष्टा करण्यात आली आहे. चित्रपटातील एका दृश्यात न्यायाधीशांना 'मामू' असे संबोधले आहे.

आम्ही पहिल्या दिवसापासूनच अशा चेष्टांना सामोरे जात आहोत. आमच्याबद्दल चिंता करू नका, असे नमूद करत मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने याचिका फेटाळून लावली.

मराठवाड्यात संततधार पाऊस; गावांचा संपर्क तुटला, जनजीवन विस्कळीत

"हास्यास्पद नाटकं करून सत्य लपवता येत नाही"; संयुक्त राष्ट्रांत पाकिस्तानवर भारताचा घणाघात

Maharashtra Rain : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; हवामान खात्याचा इशारा

गायक झुबीन गर्ग मृत्यू प्रकरण : आयोजक व मॅनेजरवर लुकआउट नोटीस जारी; मुख्यमंत्री सरमा म्हणाले, अन्यथा...

MPSC ची राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलली