रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण किंचित जास्त असणे गुन्हा नाही; विद्यार्थ्याविरोधातील ड्रंक ॲण्ड ड्राइव्हचा गुन्हा रद्द 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण किंचित जास्त असणे गुन्हा नाही; विद्यार्थ्याविरोधातील ड्रंक ॲण्ड ड्राइव्हचा गुन्हा रद्द

‘अल्कोहोल टेस्टर’ यंत्रातील तांत्रिक त्रुटीची मर्यादा लक्षात घेता रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण केवळ ०.१ मिली ग्रॅम जास्त असणे हा गुन्हा ठरवता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा देत उच्च न्यायालयाने ड्रंक ॲण्ड ड्राइव्हच्या गुन्ह्यातील आरोपी विद्यार्थ्याविरोधातील गुन्हा रद्द केला.

Swapnil S

मुंबई : ‘अल्कोहोल टेस्टर’ यंत्रातील तांत्रिक त्रुटीची मर्यादा लक्षात घेता रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण केवळ ०.१ मिली ग्रॅम जास्त असणे हा गुन्हा ठरवता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा देत उच्च न्यायालयाने ड्रंक ॲण्ड ड्राइव्हच्या गुन्ह्यातील आरोपी विद्यार्थ्याविरोधातील गुन्हा रद्द केला. मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवल्याच्या आरोपाखाली २५ वर्षीय विद्यार्थ्यावर गुन्हा नोंदवला होता. न्यायमूर्ती अश्विन डी. भोबे यांनी याचिकाकर्त्या रोहित ओझे या विद्यार्थ्याला दिलासा दिला.

रोहित ओझे हा नेदरलँड्स येथील इरास्मस युनिव्हर्सिटी रोटरडॅम येथे पदव्युत्तर शिक्षणासाठी जाणार होता. ६ जून २०२६ रोजी पहाटे १.४५ वाजता कांदिवली येथील न्यू लिंक रोडवर पोलिसांनी गाडी थांबवून ‘ब्रीथ अल्कोहोल ॲनालायझर’द्वारे त्याची तपासणी केली. या चाचणीत त्याच्या रक्तात ३०.१ मिग्रॅ/१०० मिली इतके अल्कोहोलचे प्रमाण आढळले. मोटार वाहन कायद्यानुसार अल्कोहोलची कायदेशीर मर्यादा ३० मिग्रॅ इतकी आहे. मर्यादेपेक्षा केवळ ०.१ मिग्रॅ अल्कोहोल जास्त आढळल्याने कांदिवली पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्या गुन्ह्याला आव्हान देत ओझेने उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्याच्या याचिकेची गंभीर दखल घेतानाच वकिलांनी केलेला युक्तिवाद न्यायमूर्ती भोबे यांनी ग्राह्य धरला.

निष्काळजीपणे किंवा बेदरकारपणे गाडी चालवत असल्याचा पुरावा नाही

आरोपी निष्काळाजीपणे किंवा बेदरकारपणे गाडी चालवत असल्याचा कोणताही पुरावा पोलिसांकडे नव्हता. केवळ अल्कोहोलचे प्रमाण थोडे जास्त दिसल्याने इतर कलमे लावणे अयोग्य आहे असे न्यायालयाने म्हटले आणि याचिकाकर्त्या ओझेविरोधातील ड्रंक ॲण्ड ड्राइव्हचा गुन्हा रद्द केला. पोलिसांनी याचिकाकर्त्याची कोणतीही रक्त किंवा लघवीची वैद्यकीय चाचणी केली नव्हती, असेही न्यायालयाने नमूद केले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : 'सेंच्युरी' पुनर्विकास - १,३५१ कोटींची बोली; पेडर रियल्टी राबवणार प्रकल्प, ६५० कामगारांना मिळणार घरे

गडचिरोलीत सर्पदंशाने तीन मुलींचा मृत्यू; आदिवासी आश्रमशाळेतील प्रकार, तीन जणींवर उपचार सुरू

शिवसेना खासदार बंडखोरी: सुनावणी २ आठवडे स्थगित

'भाषण नको, गोळीबाराचे आदेश कोणाचे हे सांगा'- राहुल गांधी

शांतपणे ऐकलेत तरच शहा उत्तर देतील; दिल्ली आंदोलनप्रकरणी विरोधकांना सरकारची अट