Bhayandar : दाऊद इब्राहिमचा खास साथीदार दिल्लीतून ताब्यात 
मुंबई

Bhayandar : दाऊद इब्राहिमचा खास साथीदार दिल्लीतून ताब्यात

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या ‘डी-कंपनी’शी जवळचा संबंध असल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आलेला आणि आंतरराष्ट्रीय रेड नोटीस जारी झालेला कुख्यात आरोपी अख्तर मर्चंट याला मीरा- भाईंदर, वसई-विरार गुन्हे शाखेच्या काशिमीरा गुन्हे प्रकटीकरण पथकाने दिल्ली येथून ताब्यात घेतले आहे.

Swapnil S

भाईंंदर : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या ‘डी-कंपनी’शी जवळचा संबंध असल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आलेला आणि आंतरराष्ट्रीय रेड नोटीस जारी झालेला कुख्यात आरोपी अख्तर मर्चंट याला मीरा- भाईंदर, वसई-विरार गुन्हे शाखेच्या काशिमीरा गुन्हे प्रकटीकरण पथकाने दिल्ली येथून ताब्यात घेतले आहे. खंडणीच्या गुन्ह्यात तक्रारदाराला फोन करून पैशांची मागणी करत धमकी दिल्याचा आरोप त्याच्यावर आहे. दिल्लीतील स्थानिक न्यायालयात त्याला हजर करून ट्रान्झिट रिमांड घेण्याची प्रक्रिया सुरू असून, त्यानंतर त्याला मीरा-भाईंदरमध्ये आणण्यात येणार आहे. या कारवाईमुळे मीरा-भाईंदर शहरातील संघटित गुन्हेगारी विरोधातील तपासाला महत्त्वाचे वळण मिळाले आहे.

या गुन्ह्यातील तक्रारदाराला फोन करून अख्तर मर्चंट याने खंडणीची मागणी केली होती. त्यानंतर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान मर्चंटचा सहभाग निष्पन्न झाल्यानंतर त्याचा शोध सुरू होता. अखेर गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला दिल्ली येथून ताब्यात घेतले. तर सदरील गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त गोंडुराम बांगर हे स्वतः करत आहेत. अख्तर मर्चंट याच्याविरोधात आंतरराष्ट्रीय रेड नोटीस जारी करण्यात आली होती. त्याचे वडील पूर्वी मीरा रोड येथे वास्तव्यास होते, तर मर्चंट नालासोपारात राहत असल्याची माहिती समोर आली आहे. या आधीही पालघर पोलिसांनी त्याला अटक केली होती.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : मंत्रालयातील चेहरा पडताळणी यंत्रणेचा बोजवारा; ४१ कोटी रुपयांच्या खर्चावर प्रश्नचिन्ह

२ कोटी मतदार वगळणार? राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांचा आक्षेप

नाशिकमध्ये पाण्याच्या टाकीत बुडून बहिणींचा मृत्यू

एमडीची ‘डिलिव्हरी’ होण्याआधीच दणका; कोपरीत २.३० कोटींचा ड्रग्ज साठा जप्त, गोवंडीतील तरुण पोलिसांच्या जाळ्यात

माथेरानचा एकमेव रस्ता ठरतोय पर्यटकांसाठी ‘कोंडीचा सापळा’; नेरळ-माथेरान ८ किमीच्या प्रवासाकरिता ५-६ तासांची प्रतीक्षा