Mumbai : शीव उड्डाणपुलाच्या कामासाठी विशेष ब्लॉक; ब्लॉक कालावधीत कुर्ला-सीएसएमटी दरम्यान लोकलसेवा बंद 
मुंबई

Mumbai : शीव उड्डाणपुलाच्या कामासाठी विशेष ब्लॉक; ब्लॉक कालावधीत कुर्ला-सीएसएमटी दरम्यान लोकलसेवा बंद

शीव उड्डाणपुलाचे गर्डर टाकण्याच्या कामासाठी मध्य रेल्वेने बुधवार १७ जूनपासून विशेष ब्लॉक घेतला आहे. हा ब्लॉक १७ जूनच्या मध्यरात्रीपासून सुरू होऊन २५ जूनपर्यंत टप्प्याटप्प्याने घेण्यात आला आहे. ब्लॉक कालावधीत कुर्ला ते सीएसएमटीदरम्यान लोकल सेवा काही कालावधीत बंद राहतील.

Swapnil S

मुंबई : शीव उड्डाणपुलाचे गर्डर टाकण्याच्या कामासाठी मध्य रेल्वेने बुधवार १७ जूनपासून विशेष ब्लॉक घेतला आहे. हा ब्लॉक १७ जूनच्या मध्यरात्रीपासून सुरू होऊन २५ जूनपर्यंत टप्प्याटप्प्याने घेण्यात आला आहे. ब्लॉक कालावधीत कुर्ला ते सीएसएमटीदरम्यान लोकल सेवा काही कालावधीत बंद राहतील.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, १७ जून रोजी मध्यरात्री १.१० ते ३.१०, १८ जून रोजी १२.४५ ते ३.४५, १९ व २० जून रोजी १.१० ते २.४०, तर २१ ते २४ जूनदरम्यान दररोज १.१० ते ३.१० वाजेपर्यंत माटुंगा-कुर्ला दरम्यान ब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉकमुळे अनेक लोकल गाड्यांच्या फेऱ्यांवर परिणाम होणार असून १७ जून रोजी रात्री १२.२४ वाजता सुटणारी सीएसएमटी ते ठाणे लोकल तसेच पहाटे ४.०४ वाजताची ठाणे ते सीएसएमटी लोकल रद्द करण्यात आली आहे.

१८ जून रोजी बदलापूर-परळ (रात्री १०.४०), खोपोली-परळ (रात्री १०.१५) आणि बदलापूर-सीएसएमटी (रात्री ११.२९) या लोकल सेवा कुर्ला येथेच समाप्त करण्यात येणार आहेत. तर रात्री ११.४० वाजताची ठाणे-कुर्ला लोकल सीएसएमटीपर्यंत चालवण्यात येणार आहे.

रस्त्याच्या कामावरून प्रश्न विचारताच तरुणाच्या लगावली कानशिलात; मंत्री प्रवेश वर्मांचा Video सोशल मीडियावर व्हायरल

NCMC Card : अजून कार्ड काढलं नाही? १ ऑक्टोबरपूर्वी करा नोंदणी; कुठे अन् कशी करायची? वाचा संपूर्ण प्रक्रिया

Video : आशुतोष रांकांसह CJP चे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; सुटका न झाल्यास आसामला जाणार, अभिजीत दिपकेंचा इशारा

Mumbai : अनंत चतुर्दशीला नाही तर अंगारकी संकष्टीला होते अंधेरीच्या राजाचे विसर्जन; जाणून घ्या खास परंपरा

LPU Students Protest : बलात्काराच्या अफवेने विद्यार्थ्यांचा उद्रेक; कॅम्पसमध्ये जाळपोळ, महामार्गही रोखला, Video