Mumbai : एसी लोकलमधील तांत्रिक बिघाडानंतर मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रोटोकॉल लागू (संग्रहित छायाचित्र)
मुंबई

Mumbai : एसी लोकलमधील तांत्रिक बिघाडानंतर मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रोटोकॉल लागू

प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत अशा परिस्थितीत योग्य कारवाई करण्याच्या सूचना रेल्वे प्रशासनाने संबंधित कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.

किशोरी घायवट-उबाळे

मुंबई : टिटवाळा-सीएसएमटी एसी लोकलमध्ये वातानुकूलन (AC) यंत्रणा बंद पडल्याने काही प्रवाशांची प्रकृती बिघडल्याच्या घटनेची गंभीर दखल घेत मध्य रेल्वेने एसी लोकलच्या संचालनासाठी नवा प्रोटोकॉल जाहीर केला आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत अशा परिस्थितीत तातडीने योग्य कारवाई करण्याच्या सूचना रेल्वे प्रशासनाने संबंधित कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.

मोटरमनना नव्या सूचनांची माहिती

मध्य रेल्वेने मंगळवारी (दि.१४) मोटरमनना नव्या कार्यपद्धतीबाबत सूचना दिल्या. अधिकाऱ्यांनी सांगितले की, एसी यंत्रणेत बिघाड झाल्यास प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत गाडी पुढील स्थानकावर रिकामी करण्यात येईल. त्यानंतर संबंधित रेकची तपासणी करून दुरुस्ती झाल्यानंतरच ती पुन्हा सेवेत दाखल केली जाईल.

एसी बंद राहिल्याने प्रवासी त्रस्त

सोमवारी सकाळी ८.३३ वाजताच्या टिटवाळा-सीएसएमटी एसी लोकलमध्ये दिवा स्थानकानंतर वातानुकूलन यंत्रणा अचानक बंद पडली. सुमारे १५ मिनिटे एसी बंद असल्याने डब्यात उकाडा वाढला. त्यामुळे काही प्रवाशांना गुदमरल्यासारखे वाटले, तर तीन प्रवाशांची प्रकृती बिघडली.

मुलुंडनंतर दरवाजे उघडे ठेवून धावली लोकल

प्रवाशांच्या तक्रारीनंतर मुलुंड स्थानकावर गाडी थांबवण्यात आली. त्यानंतर मुलुंड ते कुर्ला या दरम्यान डब्यात हवा खेळती राहावी म्हणून लोकलचे दरवाजे उघडे ठेवून गाडी चालवण्यात आली. पुढे कुर्ला स्थानकावर संबंधित रेक सेवेतून बाहेर काढून तिची सविस्तर तपासणी करण्यात आली.

बिघाडाचे कारण अस्पष्ट

मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, रेक कारशेडमधून बाहेर पडताना कोणताही तांत्रिक दोष आढळला नव्हता. हा बिघाड प्रवासादरम्यान निर्माण झाला. तसेच, गाडी सुरू असताना ट्रॅक्शन पर्यवेक्षकाला संबंधित डब्यात प्रवेश करता आला नसल्याने तत्काळ तपासणी करणे शक्य झाले नाही. बिघाडाचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Video : नोएडात ई-बाईक चार्जिंगवेळी भीषण आग; दोघांचा गुदमरून मृत्यू, ५० कुटुंबांची सुटका

माळशेज घाटात सोसाट्याचा वारा; दुचाकीही डगमगली, VIDEO पाहून नेटकरी थक्क

Mumbai : कौटुंबिक वादातून पत्नीची निर्घृण हत्या; ओशिवरा पोलीस ठाण्याच्या शेजारीच थरार

RailOne वरून तिकीट बुक करता? जाणून घ्या महत्त्वाचा नियम, नाहीतर भरावा लागू शकतो दंड

Mumbai : कोस्टल रोडवरील बोगद्यात धावत्या कारला आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांची धावपळ, वाहतूक विस्कळीत, Video