चेंबूर विद्यार्थी मृत्यू प्रकरण : उद्यान व रस्ते विभागाचे दोघे अधिकारी निलंबित (Photo-X)
मुंबई

चेंबूर विद्यार्थी मृत्यू प्रकरण : उद्यान व रस्ते विभागाचे दोघे अधिकारी निलंबित

चेंबूर पूर्व डायमंड गार्डनजवळ शाळेच्या बसवर मंगळवारी पिंपळ वृक्ष मुळासकट उन्मळून पडल्याने ११ वर्षीय मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत प्रथमदर्शनी निष्काळजीपणा ज्यांच्याकडून झाल्याचे निदर्शनास आले असे एम पश्चिम विभागाचे उद्यान विभागाचे सहायक अधीक्षक जगदीश भाईर तसेच रस्ते विभागाचे दुय्यम अभियंता अरुण मुंडे यांना निलंबित करण्यात आले आहे.

Swapnil S

मुंबई : चेंबूर पूर्व डायमंड गार्डनजवळ शाळेच्या बसवर मंगळवारी पिंपळ वृक्ष मुळासकट उन्मळून पडल्याने ११ वर्षीय मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत प्रथमदर्शनी निष्काळजीपणा ज्यांच्याकडून झाल्याचे निदर्शनास आले असे एम पश्चिम विभागाचे उद्यान विभागाचे सहायक अधीक्षक जगदीश भाईर तसेच रस्ते विभागाचे दुय्यम अभियंता अरुण मुंडे यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच दोन अधिकाऱ्यांवर निलंबनाची टांगती तलवार कायम आहे. दरम्यान, दुर्घटनेस जबाबदार संबंधित कंत्राटदारा विरोधातही कारवाई करण्यात येणार आहे.

चेंबूर पश्चिम येथील हरीताज प्रीतम इमारत, रोड नं. ११, डायमंड गार्डन जवळून 'युनिव्हर्सल हायस्कूल’ची बस ३० जून २०२६ रोजी दुपारी अडीचच्या सुमारास जात असताना पिंपळ वृक्ष मुळासकट उन्मळून बसवर कोसळला. दुर्घटनेत बसमध्ये एकूण १३ मुले अडकली होती. त्यापैकी १२ मुलांना तत्काळ मुंबई अग्निशमन दल, बसवाहक, स्थानिक नागरिकांमार्फत सुटका करून नजीकच्या रुग्णालयात उपचारार्थ रुग्णवाहिकेद्वारे पाठविण्यात आले. ५ विद्यार्थ्यांपैकी ४ विद्यार्थी किरकोळ जखमी होते. तर कु. विहान श्रीवास्तव ( ११) हा गंभीर जखमी असल्यामुळे त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

आठ दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश

या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी उपायुक्त (विशेष अभियांत्रिकी) पुरुषोत्तम माळवदे, उपआयुक्त (अभियांत्रिकी) शशांक भोरे यांची समिती गठीत करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच या समितीला अहवाल आठ दिवसांत सादर करण्याचे सक्त निर्देश आयुक्त    भिडे यांनी दिले आहेत. तसेच समितीने या प्रकरणात तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. तसेच अशा घटना वारंवार घडू नये यासाठी शिफारशी करण्याचेही सांगण्यात आले आहेत.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

राज्यात मान्सून दमदार; मुंबईसाठी 'ऑरेंज अलर्ट' जारी; आगामी पाच दिवस धोक्याचे; पालघर, रायगडातील शाळा आज बंद

Navi Mumbai : पाण्यातील करंटमुळे दोन तरुणी गंभीर; नवी मुंबई नेरूळमधील काळजाचा थरकाप उडवणारी घटना

Mumbai : बाल्कनीचा भाग कोसळून; वाळकेश्वरला एकाचा मृत्यू

डेंग्यूविरोधात चक्क ड्रोन आणि लष्कर तैनात

विजयाबाई नावाचे विद्यापीठ