Mumbai : सीएनजी एक रुपयाने पुन्हा महागला; ९० रुपये किलोवर दर पोहोचला 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

Mumbai : सीएनजी एक रुपयाने पुन्हा महागला; ९० रुपये किलोवर दर पोहोचला

मुंबईत ३१ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून सीएनजीच्या दरात प्रतिकिलो आणखी एक रुपयाची वाढ लागू झाली आहे.

प्रतिनिधी

अभिषेक पाठक

मुंबई : मुंबईत ३१ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून सीएनजीच्या दरात प्रतिकिलो आणखी एक रुपयाची वाढ लागू झाली आहे. इंधनाच्या दरात सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे रिक्षा आणि टॅक्सीचालकांच्या परिचालन खर्चात भर पडत असून, इंधनाचे दर असेच वाढत राहिल्यास प्रवासभाडेवाढीचा प्रश्न ऐरणीवर येण्याची शक्यता आहे.

महानगर गॅस लिमिटेडने सांगितले की, आयात केलेल्या पुनःगॅसीकृत द्रवरूप नैसर्गिक वायूसह (आरएलएनजी) नैसर्गिक वायूच्या खरेदी खर्चात वाढ झाली आहे. आरएलएनजीचे दर आंतरराष्ट्रीय गॅस निर्देशांकांशी संलग्न असल्याने जागतिक बाजारपेठेत गॅसच्या किमती वाढल्याचा परिणाम कंपनीच्या गॅस खरेदी खर्चावर झाला आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Nashik : सिंहस्थ कुंभपर्वाला शानदार प्रारंभ; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण, २१ महिने चालणार सिंहस्थ कुंभमेळा

'इंडिया' आघाडीची आज महारॅली

विदेशापेक्षा देशी विमान प्रवास महागला; मुंबई-दिल्ली विमान भाडे २६,५६०, मुंबई-लंडन २५,५०० रुपये

इंडिया आघाडीचा 'जन-महाभियोग'; खर्गे यांचे ६ आरोप, ३ मागण्या

राजस्थानची रांगोळी भरते उत्सवाचे नवरंग; घाऊक बाजारात रांगोळीचे दर स्थिर