मुंबई

''कलरफेस्ट'' एकल चित्र प्रदर्शनाला जहांगीर आर्ट गॅलरीत सुरुवात 

देवांग भागवत

चित्रकार डॉ. दत्तात्रय फडके यांच्या नवनिर्मित चित्रांचे एकल प्रदर्शन मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरी येथे भरवण्यात आले आहे. २७ डिसेंबरपासून सुरु झालेले हे प्रदर्शन २ जानेवारीपर्यंत सुरु राहणार आहे. रोज सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत हे प्रदर्शन विनामूल्य रसिकांना पाहता येणार आहे. या प्रदर्शनात त्यांनी कलात्मक शैलीत तयार केलेली विविध फॅब्रिक्स मधील आकर्षक व मनोवेधक चित्ररुपे ठेवण्यात आली आहेत.    

डॉ. दत्तात्रय फडके हे पुणे येथील डॉक्टर असून हिस्टोपॅथोलॉजिस्ट म्हणून बऱ्याच वर्षांपासून कार्यरत आहेत. मात्र बालपणापासून त्यांना फॅब्रिक्स, त्यांचे विविध पोतव रंगांचे आकर्षण होते. त्यातूनच निर्माण झालेल्या कलेला त्यांनी वृद्धिंगत करत आज आपली कला रसिकांसमोर मंडळी आहे. प्रस्तुत प्रदर्शनात त्यांनी ठेवलेली वैशिट्यपूर्ण चित्रे एका आगळ्या वेगळ्या शैलीतील आहेत. कापडाचे वेगवेगळ्या आकारांचे व रंगांचे आकर्षक असे अनेक तुकडे हव्या त्या संरचनेतून संकल्पित करून त्यातून वेगवेगळे आकार, निसर्गचित्रे, स्थिर वस्तू आकार आणि अपेक्षित दृष्यपरिणाम त्यांनी कॅनव्हासवर साकारले आहेत. ते तुकडे कलात्मकरीतीने एकत्र जुळवून त्यांना चिकटवून  व त्यांची आकर्षक मांडणी केली आहे. 

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार

३० होर्डिंग्जचे नूतनीकरण स्थगित: स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर न केल्याने दणका

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या दीड तासांचा ब्लॉक, 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

येत्या आठवड्यात बारावीचा निकाल