प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

Mumbai : वाहतूककोंडीमुळे दादरचे बसमार्ग बदलले

दादर पश्चिम परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होत असल्याने वाहतूक पोलिसांनी विविध मार्ग तात्पुरते बंद करून बेस्ट बसमार्गांमध्ये बदल केले आहेत.

Swapnil S

मुंबई : दादर पश्चिम परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होत असल्याने वाहतूक पोलिसांनी विविध मार्ग तात्पुरते बंद करून बेस्ट बसमार्गांमध्ये बदल केले आहेत.

भवानी शंकर रोड ‘अप’ दिशेला वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे मार्ग क्रमांक ५६, ८८, ११०, १५१, ८१४, १६४, १७१, २०१, ३०५, १२८, ५२ आणि ३५७ या बससेवा गोपीनाथ चव्हाण चौक येथून भवानी शंकर रोडमार्गे न जाता नामदार गोपाळ कृष्ण गोखले मार्गाने वळविण्यात आल्या आहेत. या बस प्रबोधनकार ठाकरे चौक येथे उजवे वळण घेऊन राव बहादूर एस. के. बोले रोडमार्गे हनुमान मंदिर येथे डावे वळण घेऊन पुढे एन. सी. केळकर रोडमार्गे नियोजित मार्गाने जातील. हा बदल दुपारी १२ वाजल्यापासून लागू करण्यात आला आहे.

तसेच वरळी आगार विभागात दादर पश्चिम येथे वाढलेल्या वाहतूककोंडीमुळे एस. के. बोले रोड डाऊन दिशेला प्रबोधनकार ठाकरे चौकापर्यंत वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे मार्ग क्रमांक ६३, १६५, १६९, १७२, ३५१ आणि ३८५ या बससेवा हनुमान मंदिर येथे उजवे वळण न घेता डॉक्टर यज्ञेश्वर विठ्ठल पुरंदरे चौकमार्गे पुढे भवानी शंकर रोडने गोपीनाथ चव्हाण चौक येथे उजवे वळण घेऊन काकासाहेब गाडगीळ मार्ग, शंकर घाणेकर मार्ग आणि स्वर्गीय एकनाथ ठाकूर चौक मार्गे अप्पासाहेब मराठे मार्गाने पुढे नियोजित मार्गावर धावतील. हा बदल सायंकाळी ४.५० वाजल्यापासून लागू करण्यात आला आहे.

दरम्यान, दादर स्टेशनकडून कबूतरखाना येथे येणारा मो. ची. जावळे मार्ग वाहतूक पोलिसांकडून बंद केला. त्यामुळे मार्ग क्रमांक ११८ ही बस दादर स्टेशन येथून डावे वळण घेऊन डी’सिल्वा रोडमार्गे विसावा हॉटेल येथे डावे वळण घेऊन एन. सी. केळकर रोडमार्गे पुढे नियोजित मार्गाने धावेल. तसेच एस. के. बोले रोड डाऊन दिशेला वाहतूक बंद केल्याने नव्याने सुरू करण्यात आलेला मार्ग क्रमांक ८१४ देखील परावर्तित करण्यात आला आहे. ही बस दादर स्टेशन येथून डी’सिल्वा रोड, विसावा हॉटेल, एन. सी. केळकर रोड, डॉक्टर यज्ञेश्वर विठ्ठल पुरंदरे चौक, भवानी शंकर रोड आणि गोपीनाथ चव्हाण चौकमार्गे यू-टर्न घेऊन नामदार गोपाळ कृष्ण गोखले रोडने प्रबोधनकार ठाकरे चौक येथे डावे वळण घेऊन एस. के. बोले रोडमार्गे सिद्धिविनायककडे जाईल.

या बदलांमुळे प्रवाशांनी बसच्या सुधारित मार्गांची नोंद घेऊन प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन बेस्ट प्रशासन आणि वाहतूक पोलिसांनी केले.

जेवणाची थाळी महागली...! शाकाहारी थाळी २९ रुपयांनी वाढली; ब्रॉयलर कोंबडी १० टक्क्यांनी महागली, मांसाहारी थाळीही महागच

Thane : कावेसरमध्ये महापालिकेची CBSE शाळा; पूर्व प्राथमिक ते दहावीपर्यंत शिक्षणाची सुविधा

स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी राज्यस्तरीय कृती दलाची स्थापना; अध्यक्षपदी डॉ. नीलम गोऱ्हे यांची नियुक्ती

राज्याच्या लॉजिस्टिक्स व सागरी क्षमतेला मोठा बूस्ट; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

पीएम-फिनटेक परिषद : मोदींचे UPI विस्ताराचे आवाहन