मुंबई

डोंबिवली : 'एमआयडीसी'मधील केमिकल कंपनीत भीषण स्फोट; ५ ते ६ कामगार जखमी

Swapnil S

डोंबिवलीच्या एमआयडीसी फेज दोन मधील अमुदान केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाला आहे. गुरूवारी दुपारच्या सुमारास झालेल्या या स्फोटाचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही, मात्र बॉयलर फुटल्याने स्फोट झाल्याचे सांगितले जात आहे. स्फोटानंतर भीषण आग लागून आकाशात धुराचे प्रचंड लोट उठले आहेत. स्फोट इतका भीषण होता की दोन-तीन किलोमीटरपर्यंत आवाज गेला.

पहिला स्फोट झाल्यानंतर छोट्या स्फोटांचे काही आवाजही ऐकू आले. या घटनेत पाच ते सहा कामगार जखमी झाल्याची माहिती आहे. सुदैवाने कोणत्याही जीवितहानीचे अद्याप वृत्त नाही. आग आजूबाजूच्या इतर कंपन्यांमध्ये पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. स्फोटाची तीव्रता इतकी होती की, आजूबाजूच्या इमारतीच्या, तसेच रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांच्या काचांनाही तडे गेलेत. अग्निशमन दलाचे ५ ते ६ बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. केमिकल कंपन्या असलेल्या भागातच नागरी वस्तीही आसपास असल्याने चिंता व्यक्त होत आहे.

या स्फोटाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त