निवडणूक निर्णय अधिकारी मतदान केंद्रांची प्रत्यक्ष पाहणी करणार; महापालिका आयुक्तांनी दिले निर्देश (संग्रहित छायाचित्र)
मुंबई

Mumbai: निवडणूक निर्णय अधिकारी मतदान केंद्रांची प्रत्यक्ष पाहणी करणार; महापालिका आयुक्तांनी दिले निर्देश

मतदान केंद्रांची अंतिम यादी तयार करण्यापूर्वी मतदान केंद्रांची प्रत्यक्ष पाहणी करावी. निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांची नियोजित कालमर्यादेत नियुक्ती करून त्यांना प्रशिक्षण देण्यात यावे. निवडणुकीच्या अनुषंगाने विविध पथके कार्यरत ठेवावीत, असे विविध निर्देश मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी दिले आहेत.

Swapnil S

मुंबई : मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणात व्हावी यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आवश्यक दक्षता घ्यावी. मतदान केंद्रांची अंतिम यादी तयार करण्यापूर्वी मतदान केंद्रांची प्रत्यक्ष पाहणी करावी. निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांची नियोजित कालमर्यादेत नियुक्ती करून त्यांना प्रशिक्षण देण्यात यावे. निवडणुकीच्या अनुषंगाने विविध पथके कार्यरत ठेवावीत, असे विविध निर्देश मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी दिले आहेत. दरम्यान, आदर्श आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलीस, उत्पादन शुल्क व इतर विभागामार्फत प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले.

मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रमाच्या अनुषंगाने महानगरपालिका अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी, पोलीस, उत्पादन शुल्क खात्याचे अधिकारी यांची संयुक्त बैठक गुरुवारी महानगरपालिका मुख्यालयात झाली. त्यावेळी ते बोलत होते.

अंतिम मतदान यादी तयार करा

राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक मतदान केंद्र निश्चितीबाबत निकष ठरवून दिले आहेत. त्यानुसार, बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात सुमारे १० हजार १११ मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रांवर वीज पुरवठा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रसाधनगृहे, रॅम्प आदींची सुविधा करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्याची पाहणी, पडताळणी करावी. त्यानंतर अंतिम मतदान केंद्र यादी तयार करावी. मतदारांना त्यांची नावे शोधण्यासाठी मतदान केंद्रानजीक 'मतदार सहाय्य केंद्र' स्थापित करावे. मतदान केंद्रांवर मतदारांना माहिती देणारे फलक लावावेत, असे निर्देश गगराणी यांनी दिले.

Mumbai : खोटी विधाने करून कोर्टाची दिशाभूल करणे महागात पडले; हायकोर्टाने याचिकाकर्त्याला ठोठावला १ लाखाचा दंड

Mumbai : मे अखेरपर्यंत कोस्टल रोडवर दोन फ्लड गेट्स बसवणार; इंदूर येथे चाचणी झाली पूर्ण

Mumbai : ५० लाखांच्या लाचेची मागणी करणाऱ्या 'डीआरआय'च्या दोन अधिकाऱ्यांवर गुन्हा

मुंबईत एक आठवडा ५ टक्के पाणीकपात; जलबोगद्यांचे क्लोरीनीकरण करणार

एसटी बस स्थानकांवरील शौचालये १ जूनपासून मोफत; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा