मुंबई

सलग दुसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजारात तेजी,सेन्सेक्स ४२७ अंकांनी वधारला

शेअर बीएसई सेन्सेक्स ४२७.४९ अंक किंवा ०.८० टक्का वधारुन ५४,१७८.४६ वर बंद झाला.

वृत्तसंस्था

जागतिक बाजारातील सकारात्मक वातावरणाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजारात तेजी राहिली. त्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी जवळपास १ टक्का वधारला. सेन्सेक्स ४२७ अंकांनी वधारला.

दि ३०-शेअर बीएसई सेन्सेक्स ४२७.४९ अंक किंवा ०.८० टक्का वधारुन ५४,१७८.४६ वर बंद झाला. दिवसभरात तो ५०३.८२ अंकांनी वधारुन ५४,२५४.७९ ही कमाल पातळी गाठली होती. अशाच प्रकारे राष्ट्रीय शेअर बाजारात निफ‌्टी १४३.१० अंक किंवा ०.८९ टक्का वाढून १६,१३२.९० वर बंद झाला.

सेन्सेक्सवर्गवारीत टायटन, टाटा स्टील, लार्सन ॲण्ड टुब्रो, इंडस‌्इंड बँक, महिंद्रा ॲण्ड महिंद्रा, आयसीआयसीआय बँक आणि कोटक महिंद्रा बँक यांच्या समभागात वाढ झाली. तर डॉ. रेड्डीज लॅब, नेस्ले, रिलायन्स इंडस्ट्रीज, भारती एअरटेल, हिंदुस्तान युनिलिव्हर आणि बजाज फायनान्स यांच्या समभागात घसरण झाली. आशियाई बाजारात टोकियो, सेऊल, शांघायमध्ये सकारात्मक वातावरण होते. तर युरोपमधील बाजारात दुपारपर्यंत वाढ झाली होती. अमेरिकन बाजारात बुधवारी तेजी होती.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय तेल बाजारात ब्रेंट क्रूड ०.०५ टक्का वधारुन प्रति बॅरलचा भाव १००.७ अमेरिकन डॉलर्स झाला. तर विदेशी गुंतवणू संस्थांनी पुन्हा खरेदी सुरु केल्याने दिलासा मिळाला आहे. विदेशी संस्थांनी बुधवारी ३३०.१३ कोटींच्या समभागांची खरेदी केली.

सरसकट बंदी नको, आवाजाची मर्यादा आखून द्या; पुण्यातील तरुणांनी सुचवला उपाय

अभियांत्रिकीच्या संस्थात्मक प्रवेशावर कडक नजर; सीसीटीव्हीची नजर, निरीक्षकही नेमणार

बार कौन्सिलचे मिश्रा यांचे पद केवळ तात्पुरते; सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी

महाराष्ट्रातील टोलनाक्यांवर ईडीचे छापे; टोल वसुली अन्यत्र वळवल्याचा संशय

उपांत्य फेरी गाठण्याची संधी; भारतीय महिलांची आज हाँगकाँगशी गाठ, फलंदाजांकडून सुधारणा अपेक्षित