मुंबई

मुंबई महापालिकेच्या २४ वार्डात मोफत वाचनालय सुरु

प्रतिनिधी

डिजिटल युगात पुस्तक वाचनाची गोडी तरुण पिढीत निर्माण व्हावी यासाठी मुंबई महापालिकेच्या २४ वार्डात मोफत व खुले वाचनालय टप्प्या टप्प्याने सुरु करण्यात येत आहेत. उद्यान विभागाच्या संकल्पनेस हातभार लावण्यासाठी खासगी संस्थांनी पुढाकार घेतल्याचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी सांगितले.

मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमास मुंबईकरांची पसंती मिळत आहे. मुंबईकर विशेष करुन तरुण पिढी वाचनासाठी उद्यान येत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. याचाच एक भाग म्हणून आतापर्यंत 'ए' विभागातील कुपरेज बॅन्डस्टॅंड गार्डन, 'एफ / उत्तर' विभागातील बी. एन. महेश्वरी उद्यान व बी. एन. वैद्य उद्यान, 'के / पूर्व' विभागातील रमेश मोरे पार्क, 'आर / मध्य' विभागातील हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ड्रिमपार्क आणि 'टी' विभागातील लाला तुळशीराम देवीदयाल उद्यान अशा एकूण ७ उद्यानांमध्ये 'खुले वाचनालय' उभारण्यात आले आहेत. तसेच, याच धर्तीवर उर्वरीत विभागातील उद्यानांमध्ये लवकरच खुले वाचनालय सुरु करण्यात येईल व या उपक्रमास हातभार लावण्यासाठी ‘मेघा’ श्रेय संस्थेच्या संस्थापिका, सिमा सिंग, प्रोजेक्ट मुंबई, एकता मंच अशा विविध संस्थांनी यामध्ये स्वारस्य दाखविला आहे, असे परदेशी यांनी सांगितले.

मियावाकी पध्दतीने वृक्ष लागवड करणे, शहरी जंगल उभारणे, उद्यानांचा विकास करणे, उद्यानांमध्ये विविध सुविधा सुभारणे याचाच एक भाग म्हणून महानगरपालिकेच्या २४ विभागांतील प्रत्येकी एका विभागामधील एका उद्यानामध्ये म्हणजेच २४ उद्यानांमध्ये ‘खुले वाचनालय’ हे उद्यानात येणाऱ्या लोकांसाठी संपुर्णतः मोफत असेल असा उपक्रम उद्यान विभागातर्फे राबविण्यात येत आहे.

Lok Sabha Elections 2024: महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत किती टक्के मतदान ? बघा संपूर्ण आकडेवारी

मराठी "not welcome" म्हणणार्‍या लोकांना कृपया मत देऊ नका; रेणुका शहाणेंची पोस्ट चर्चेत

मतदान केल्यानंतर सुप्रिया सुळे अचानक अजित पवारांच्या घरी; म्हणाल्या...

Lok Sabha Elections 2024:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमध्ये केले मतदान; तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात!

ईशा अंबानी, नताशा पुनावाला ते आलिया भट्ट ; 'मेट गाला २०२४' ला 'या' भारतीयांनी लावली हजेरी!