Mumbai : खार येथील झाड दुर्घटनेतील ‘त्या’ मुलीचा मृत्यू; हर्षिता कुमार हीची प्रकृती गंभीर  'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

Mumbai : खार येथील झाड दुर्घटनेतील ‘त्या’ मुलीचा मृत्यू; हर्षिता कुमार हीची प्रकृती गंभीर

खार पश्चिम येथील लिंकिंग रोडवर १० मे रोजी रिक्षावर झाड कोसळले. या घटनेत रिक्षात बसलेल्या आरिका श्रीवास्तव ( १४) व हर्षिता कुमार (२१) या दोघी गंभीर जखमी झाल्या.

Swapnil S

मुंबई : खार पश्चिम येथील लिंकिंग रोडवर १० मे रोजी रिक्षावर झाड कोसळले. या घटनेत रिक्षात बसलेल्या आरिका श्रीवास्तव ( १४) व हर्षिता कुमार (२१) या दोघी गंभीर जखमी झाल्या. दोघा जखमींना पी. डी. हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, आरिका श्रीवास्तव हीची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली असून रविवारी सकाळी ६ वाजता मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, हिंदुजा रुग्णालयात उपचार घेणारी हर्षिता कुमार हीची प्रकृती गंभीर असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

खारमधील लिंकिंग रोडवर १० मे रोजी रिक्षावर झाड कोसळले. यात रिक्षात बसलेल्या आरिका श्रीवास्तव व हर्षिता कुमार या दोघी गंभीर जखमी झाल्या होत्या.

आजचे राशिभविष्य, १४ सप्टेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

हरतालिका तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा! सौभाग्य, सुख-समृद्धीसाठी प्रियजनांना पाठवा खास शुभेच्छा संदेश अन् शेअर करा आकर्षक कार्ड्स

Ganesh Chaturthi 2026 : 'लाडक्या बाप्पाची स्वारी आली!' आप्तेष्टांना पाठवा प्रेम, आनंद आणि भक्तीने सजलेल्या मराठी शुभेच्छा अन् HD कार्ड्स

चवीतला गणेशोत्सव

माटवी : कोकणच्या निर्सगाशी जुळलेली नाळ