मुंबई

भाजप उमेदवाराचा प्रचार, ‘त्या’ सरकारी कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करा; काँग्रेस उमेदवाराची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

मंत्रालयात प्रतिनियुक्तीवर असलेले शासकीय कर्मचारी नगरपालिका व नगरपंचायतींच्या निवडणुकीत चिखली नगरपरिषदेत भाजप उमेदवारांचा प्रचार करत असल्याचे समोर आले आहे.

Swapnil S

मुंबई : मंत्रालयात प्रतिनियुक्तीवर असलेले शासकीय कर्मचारी नगरपालिका व नगरपंचायतींच्या निवडणुकीत चिखली नगरपरिषदेत भाजप उमेदवारांचा प्रचार करत असल्याचे समोर आले आहे. चिखली विधानसभेच्या आमदार श्वेता महाले यांचे पती विद्याधर महाले या निवडणूक प्रचारात सहभागी असून त्यांना निवडणूक होईपर्यंत पुन्हा मंत्रालयात पाठवावे अन्यथा शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी चिखलीतील काँग्रेसचे उमेदवार काशिनाथ बोंद्रे यांनी बुलढाण्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

विद्याधर दयासागर महाले हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासगी सचिव असून ते चिखली विधानसभेच्या आमदार श्वेता महाले यांचे पती आहे.

विद्याधर महाले हे शासकीय कर्मचारी असून अनेक वर्षापासून प्रतिनियुक्तीवर मंत्रालयात कार्यरत आहे. त्यांना महाराष्ट्र कर्मचारी सेवा नियम (वर्तणूक) १९७९ लागु आहे. असे असताना विद्याधर महाले हे चिखली मतदारसंघात खुलेआम 'भाजप’ उमेदवारांचे प्रचार करण्यासाठी मुंबईवरून चिखली येथे थांबून शासकीय कर्मचाऱ्यांच्या तथा कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आहेत. तसेच त्यांच्या पदाचा दुरुपयोग करत आहेत, त्यामुळे नमूद कायद्याचे उल्लंघन होत आहे.

यापूर्वीही विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ दरम्यान त्यांनी त्यांच्या पत्नीसाठी चिखली मतदारसंघात येऊन त्यांचा पदाचा दुरुपयोग करून खुलेआम भाजपचा प्रचार केला होता.

महाले यांनी निवडणुकीचा प्रचार केल्याचे पुरावे समाज माध्यमांवर सतत प्रसारित केले आहे. तरीही त्यांच्यावर कोणतीच कारवाई झालेली नाही. मुख्यमंत्र्यांचे ते खासगी सचिव असल्याने त्यांचा निवडणूक आयोगावर दबाव आहे, हे यावरून दिसून येते.

चिखली नगरपरिषद निवडणूक २०२५ निपक्ष तथा भयमुक्त होण्यासाठी विद्याधर महाले यांना निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत मुंबई मुख्यालयी ठेवण्याचे आदेश पारित करावे व त्यांच्यावर नमूद नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

न्यायमूर्ती यशवंत वर्मा अडचणीत; जळीत नोटांप्रकरणातील आरोप सिद्ध, संसदीय चौकशी समितीचा अहवाल

SpiceJet Flight : टेकऑफच्या आधी विमानात असह्य उकाडा; श्वास घेण्यासही त्रास, प्रवाशांचा संताप, Video व्हायरल

Mumbai Crime : प्रेमविवाहानंतर ५ वर्षांत संसाराचा भयंकर शेवट! पत्नीच्या छातीत चाकू भोसकला, ४ वर्षांच्या मुलाला सोडून पती फरार

Gujarat : इमारतीच्या ३२व्या मजल्यावर क्रेनला लटकलेल्या अवस्थेत कामगाराचा मृतदेह; धक्कादायक घटनेचा VIDEO समोर

IndiGo विमानाचं इंजिन हवेतच बंद; २२४ प्रवाशांचा जीव टांगणीला, चेन्नई विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग