मुंबई

'या' कारणामुळे पदवी आणि पदव्युत्तर परीक्षांना देण्यात आली स्थगिती

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काल या सर्व संघटनांची बैठक झाली

प्रतिनिधी

मुंबई विद्यापीठाच्या ३ फेब्रुवारीपासून होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मुंबई विद्यापीठातील कर्मचारी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काल या सर्व संघटनांची बैठक झाली. दरम्यान, 2 फेब्रुवारी रोजी विद्यापीठाच्या 10 परीक्षा सुरळीत पार पडल्या आहेत.

शैक्षणिक वर्ष 2022-2023 च्या ऑक्टोबर-नोव्हेंबर 2022 हिवाळी सत्रातील पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या परीक्षा विविध केंद्रांवर सुरू आहेत. या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत.

या मागणीच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य विद्यापीठ व महाविद्यालयीन कर्मचारी संयुक्त कृती समितीने २ फेब्रुवारीपासून परीक्षा कामकाजावर बहिष्कार टाकून आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे परीक्षेत अडचणी निर्माण झाल्यामुळे मुंबई विद्यापीठाने हा निर्णय घेतला आहे. विद्यापीठातर्फे ३ फेब्रुवारीपासून घेण्यात येणाऱ्या परीक्षा स्थगित करण्यात आल्याची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाईल.

गृहिणी म्हणजे ‘राष्ट्रनिर्मात्या’; त्यांच्या योगदानाचे मूल्य दरमहा किमान ३० हजार रुपये, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

आता ST कर्मचाऱ्यांनाही ५८ टक्के महागाई भत्ता; घरभाडे भत्ताही वाढविण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा

Pune : पेपर फुटल्यास दहा हजारांची नुकसानभरपाई द्यावी; कॉकरोच जनता पार्टीची मागणी

संत्रा निर्यातीवरील अनुदान राज्य सरकारकडून रद्द

Kolkata : कल्याण बॅनर्जींनीही ममतांची सोडली साथ