मालकी हक्काच्या जमिनीवर बेकायदा बंगले; मढप्रकरणी SIT ला सहकार्य करण्याचे आदेश 
मुंबई

मालकी हक्काच्या जमिनीवर बेकायदा बंगले; मढप्रकरणी SIT ला सहकार्य करण्याचे आदेश

जमिनीच्या नोंदींमध्ये मोठ्या प्रमाणात छेडछाड केल्याच्या आरोपांच्या चौकशीसाठी स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाला (एसआयटी) १० दिवसांत सहकार्य करा, असे निर्देश उच्च न्यायालयाने पश्चिम उपनगरातील अतिक्रमण विभागाचे अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि गोरेगावमधील पी-उत्तर वॉर्डच्या सहाय्यक आयुक्तांना दिले.

Swapnil S

मुंबई : जमिनीच्या नोंदींमध्ये मोठ्या प्रमाणात छेडछाड केल्याच्या आरोपांच्या चौकशीसाठी स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाला (एसआयटी) १० दिवसांत सहकार्य करा, असे निर्देश उच्च न्यायालयाने पश्चिम उपनगरातील अतिक्रमण विभागाचे अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि गोरेगावमधील पी-उत्तर वॉर्डच्या सहाय्यक आयुक्तांना दिले.

एसआयटीला सहकार्य न केल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशाराही न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या खंडपीठाने दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिला. याप्रकरणी १३ ऑक्टोबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

जमिनीच्या नोंदींमध्ये मोठ्या प्रमाणावर फेरफार केल्याचा रॅकेटमध्ये सरकारी कर्मचारी, पालिका कर्मचारी आणि दलाल यांचा शेकडो फेरफार केलेले तसेच बनावट शहर सर्वेक्षण नकाशे तयार करण्यात सहभाग असल्याचा आरोप आहे.

याप्रकरणी न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

खंडपीठाने दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना न्यायालयात उपस्थित राहण्याचे निर्देश दिले होते. त्यांनी हजेरी लावल्यानंतर खंडपीठाने त्यांचा चांगलाच समाचार घेतला.

एसआयटीला सहकार्य करण्याबाबत सक्त ताकीद दिली. एसआयटीला सहकार्य न केल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा न्या. रेवती मोहिते डेरे आणि न्या. संदेश पाटील यांच्या खंडपीठाने यावेळी दिला.

Mumbai : झाडांवर विषप्रयोग केला तर थेट गुन्हा दाखल होणार; बाजार व उद्यान समिती अध्यक्ष हेतल गाला यांचे निर्देश

देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात; प्रायोगिक तत्त्वावर योजना राबवण्याची महसूल विभागाची तयारी

Mumbai : म्हाडाकडे घरबसल्या करता येणार तक्रार; सीएफसी@होम, व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीमचे अनावरण

Mumbai : शस्त्रक्रियांचा दर्जा, अचूकता, सुरक्षितता वाढणार; KEM रुग्णालयात प्रगत ‘व्हेसल सीलर’ तंत्रज्ञान

Mumbai : नालेसफाईच्या कामात तीन तेरा; मिठी नदीतील गाळ उपसा करण्यात अपुरी यंत्रणा, सत्ताधारी पक्षाच्या पाहणी दौऱ्यात पोलखोल