प. आशियातील संघर्षामुळे हेलियमची टंचाई; मुंबईतील MRI सेवा सुरळीत 
मुंबई

प. आशियातील संघर्षामुळे हेलियमची टंचाई; मुंबईतील MRI सेवा सुरळीत

आरोग्य क्षेत्रात रुग्णांचे निदान करायला वापरण्यात येणाऱ्या ‘एमआरआय’ स्कॅनिंगमध्ये वापरण्यात येणाऱ्या हेलियमची टंचाई निर्माण झाली आहे. ही बाब आरोग्य क्षेत्रासाठी चिंताजनक ठरली आहे.

अमित श्रीवास्तव

मुंबई : आरोग्य क्षेत्रात रुग्णांचे निदान करायला वापरण्यात येणाऱ्या ‘एमआरआय’ स्कॅनिंगमध्ये वापरण्यात येणाऱ्या हेलियमची टंचाई निर्माण झाली आहे. ही बाब आरोग्य क्षेत्रासाठी चिंताजनक ठरली आहे.

मानवी शरीराच्या स्पष्ट प्रतिमा मिळवण्यासाठी एमआरआय मशिनमध्ये शक्तिशाली ‘सुपरकंडक्टिंग मॅग्नेट्स’चा वापर केला जातो. हे चुंबकीय क्षेत्र प्रभावीपणे कार्य करण्यासाठी ते उणे तापमानात ठेवावे लागतात आणि त्यासाठी द्रव हेलियम अनिवार्य आहे.

‘महाराष्ट्र राज्य रेडिओलॉजी असोसिएशन’चे माजी अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील यांनी स्पष्ट केले की, एमआरआय मशिनमध्ये वारंवार हेलियम भरण्याची गरज नसते. नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे वैद्यकीय सेवा संचालक आणि रेडिओलॉजी विभाग प्रमुख डॉ. दीपक पत्कर यांनी सांगितले की, जुन्या एमआरआय मॉडेल्सना तीन वर्षांनी रिफिलिंगची गरज असते, तर नवीन मशिन पाच वर्षांपर्यंत चालू शकतात. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे हेलियमच्या पुरवठ्यावरील अवलंबित्व कमी झाले आहे.

ऑफिसमध्ये WhatsApp Web वापरताय? लॉगआउट न करताच निघू नका; गृह मंत्रालयाचा इशारा, वाचा सविस्तर

Dhruv Rathee : यूट्यूबर ध्रुव राठीच्या अडचणीत वाढ; २०१८ च्या मानहानी प्रकरणात दिल्ली कोर्टाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी

Solapur : बोअरवेलमध्ये पडून दीड वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू; रात्रभर बचावकार्य सुरू, पण प्रयत्न अपयशी, पंढरपुरात हळहळ

Bisleri Water Controversy : बिस्लेरीच्या बाटलीबंद पाण्यावर FSSAI ची कारवाई; कंपनीचं स्पष्टीकरण समोर, नेमकं प्रकरण काय?

Chhatrapati Sambhajinagar : प्रवासी झोपेत असतानाच खासगी बसची पुलाच्या कठड्याला जोरदार धडक; २ जणांचा मृत्यू, २७ जखमी