मुंबई

नवाब मलिक यांना दिलासा देण्यास उच्च न्यायालयाचा नकार

प्रतिनिधी

मनी लाँिड्रंग प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. राज्यसभेनंतर आता विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदान करण्यची परवानगी हवी असेल, तर आधी ही याचिका मागे घ्या असा सल्ला न्यायामूर्ती प्रकाश नाईक यांनी देताना नव्याने याचिकाकरण्याची भुभा दिला. त्यानुसार मलिका यांनी नव्याने याचिका दाखल केली असून त्यावर मंगळवारी न्या. भारती डांगरे यांच्यासमोर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी नवाब मलिक यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने मलिक यांची याचिका फेटाळून लावली होती. याच याचिकेत दुरूस्ती करून २० जून रोजी विधान परिषदेची निवडणुक मतदानाची परवानगी द्यावी अशी विनंती मलीक यांच्यावतीने करण्यात आली. मात्र न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांनी ती फेटाळून लावली.या आधी करण्यात आलेली याचिका ही विशेष न्यायालयाच्या आदेशाविरोधात होती. त्यात राज्यसभा निवडणूकीसाठी मतदानाची मागणी केली होती. त्या याचिकेत दुरुस्ती करण्याची मूभा देता येणार नाही, असे स्पष्ट करत न्यायालयाने मलिक यांना नव्याने याचिका दाखल करण्याची मुभा दिली. त्यानुसार मलिक यांनी आधीची याचिका मागे घेत विधान परिषद निवडणुकीतील मतदानाच्या परवानगीसाठी नव्याने याचिका दाखल केली आहे.

पाचव्या टप्प्यातील प्रचार संपला; अखेरच्या क्षणी मतदार भेटीसाठी सर्वपक्षीय लगबग

आम्ही भाजप मुख्यालयात येतो, अटक कराच! अरविंद केजरीवाल यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट आ‌व्हान

मोदींच्या बुलडोझरच्या वक्तव्याला इंडिया आघाडीचा आक्षेप; निवडणूक आयोगाने मोदींवर कारवाई करावी - खर्गे

क्रॉफर्ड मार्केटने टाकली कात, लवकरच मुंबईकरांच्या सेवेत

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार