बाळासाहेबांवर लवकरच टपाल तिकीट; राहुल शेवाळे यांच्या मागणीची केंद्राकडून दखल (संग्रहित छायाचित्र)
मुंबई

बाळासाहेबांवर लवकरच टपाल तिकीट; राहुल शेवाळे यांच्या मागणीची केंद्राकडून दखल

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष टपाल तिकीट जारी करून भारतीय टपाल विभागाकडून अनोखी आदरांजली दिली जाणार आहे.

Swapnil S

मुंबई : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष टपाल तिकीट जारी करून भारतीय टपाल विभागाकडून अनोखी आदरांजली दिली जाणार आहे. या संदर्भात शिवसेना सरचिटणीस, माजी खासदार राहुल शेवाळे यांनी केलेल्या मागणीची दखल भारतीय टपाल विभागाने घेतली असून लवकरच यावर सकारात्मक निर्णय घेतला जाणार आहे. या मागणीबाबत केंद्र सरकारकडून नुकतेच एक पत्र प्राप्त झाल्याची माहिती शेवाळे यांच्याकडून देण्यात आली.

भारतीय टपाल विभागातील उपमहासंचालक कार्यालयाकडून शेवाळे यांना प्राप्त झालेल्या पत्रात लिहिले आहे की, फिलाटेल (संग्रह) विभागाच्या सल्लागार समितीच्या आगामी बैठकीत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विशेष टपाल तिकीट जारी करण्याबाबत चर्चा करण्यात येईल. त्यामुळे लवकरच अशा प्रकारचे तिकीट जारी केले जाण्याची शक्यता आहे.

जानेवारी महिन्यात केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना दिलेल्या लेखी निवेदनात शेवाळे यांनी म्हटले की, २७ जानेवारीला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची १०० वी जयंती देशभरात मोठ्या आनंदाने साजरी करण्यात आली. जन्मशताब्दी वर्षाच्यानिमित्ताने बाळासाहेबांना अनोखी श्रद्धांजली द्यावी, ही चाहत्यांची इच्छा प्रत्यक्षात आणण्यासाठी केंद्राने विशेष टपाल तिकीट जारी करून यथोचित सन्मान करावा.

SRA कायद्याचे ऑडिट करा, तज्ज्ञ समिती नेमा! हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश

Mumbai : देवनार पशुवधगृहात बकरी ईद सणासाठी पालिकेच्या सोयीसुविधा; म्हैस, बकऱ्यांच्या बाजाराचे आयोजन

प्राणी गणनेत जळगाव जिल्ह्यात तीन वाघांचे दर्शन; वढोदा-चारठाणा परिसरातील 'बनाना टायगर' क्षेत्र पुन्हा चर्चेत

व्यापार करार अधांतरी! भारत-अमेरिका व्यापार चर्चेचा वेग मंदावण्याची शक्यता

मुंबई विभागातील १ हजार ४६१ शाळांचा निकाल १०० टक्के; सर्वाधिक ५९५ शाळा; ठाण्यात ४४२ शाळांची उल्लेखनीय कामगिरी