जयशंकर-रुबियो यांच्यात ऊर्जा, संरक्षणावर चर्चा; धोरणात्मक भागीदारी पुढे नेण्यावर भर X
मुंबई

जयशंकर-रुबियो यांच्यात ऊर्जा, संरक्षणावर चर्चा; धोरणात्मक भागीदारी पुढे नेण्यावर भर

भारत आणि अमेरिकेतील द्विपक्षीय संबंधांमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो आणि भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यात मंगळवारी विविध विषयांवर चर्चा झाली. या चर्चेत प्रामुख्याने ऊर्जा क्षेत्रातील सहकार्य आणि संरक्षण संबंधांवर भर देण्यात आला.

Swapnil S

मुंबई/नवी दिल्ली : भारत आणि अमेरिकेतील द्विपक्षीय संबंधांमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो आणि भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यात मंगळवारी विविध विषयांवर चर्चा झाली. या चर्चेत प्रामुख्याने ऊर्जा क्षेत्रातील सहकार्य आणि संरक्षण संबंधांवर भर देण्यात आला.

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियो हे तीन दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी मंगळवारी मुंबईत दाखल झाले. परराष्ट्र मंत्री म्हणून भारताचा पहिला दौरा केल्यानंतर जवळपास पाच महिन्यांनी ते पुन्हा भारतात आले आहेत. मुंबईत दाखल झाल्यानंतर काही वेळातच त्यांची जयशंकर यांच्यासोबत बैठक झाली. जयशंकर यांच्याशी चर्चा करण्यापूर्वी रुबियो यांनी ताज स्मारकाला भेट दिली. यावेळी त्यांनी २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली अर्पण केली. या हल्ल्यात सहा अमेरिकी नागरिकांचाही मृत्यू झाला होता.

भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी ऊर्जा सुरक्षा आणि संरक्षण सहकार्याबाबत चर्चा केली. त्याचबरोबर भारत-अमेरिका पुढे धोरणात्मक भागीदारी नेण्याच्या महत्त्वावरही आम्ही भर दिला,’ असे रुबिओ यांनी म्हटले आहे. भारत-अमेरिका ऊर्जा संबंधांबाबत तसेच बुधवारी जामनगर येथील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या तेलशुद्धीकरण प्रकल्पाला देण्यात येणाऱ्या भेटीबाबत माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांनाही रुबिओ यांनी उत्तरे दिली. रुबिओ आणि जयशंकर यांच्या बैठकीत भारत-अमेरिका प्रस्तावित व्यापार कराराचा मुद्दा उपस्थित झाला होता की नाही, याबाबत तातडीने माहिती मिळू शकली नाही.

भारत दौऱ्यापूर्वी उझबेकिस्तानमध्ये बोलताना रुबिओ यांनी भारतासोबतचा व्यापार करार अंतिम करण्याच्या अगदी जवळ अमेरिका पोहोचल्याचे म्हटले होते. रशियन तेलाच्या खरेदीसंदर्भात देण्यात आलेल्या अमेरिकी शुल्कसवलतीच्या निर्णयाशी या कराराचा संबंध असल्याचे संकेतही त्यांनी दिले होते.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Uddhav Thackeray Dussehra Rally : सत्ता परिवर्तनासाठी सज्ज व्हा, दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांचे आवाहन

Eknath Shinde Dussehra Rally: भाषणांपेक्षा प्रत्यक्ष कामावर विश्वास; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठणकावले

आंदोलनांमुळे फुटीचा धोका - सरसंघचालक; विजयादशमी महोत्सवात केले शस्त्रपूजन

राष्ट्रीय हितासाठी एकत्र यावे; पंतप्रधान मोदी यांचे आवाहन

बड्या व्यक्तीच्या हत्येचा होता कट; टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात नवा खुलासा