Mumbai : जुहू येथे नाल्यात पडून तरुणाचा मृत्यू 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

Mumbai : जुहू येथे नाल्यात पडून तरुणाचा मृत्यू

अंधेरी पश्चिम येथील जुहू परिसरातील नाल्यात शनिवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास निहाल नाझिम मिर्झा (२४) हा तरुण पडला. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला बाहेर काढत कूपर रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Swapnil S

मुंबई : अंधेरी पश्चिम येथील जुहू परिसरातील नाल्यात शनिवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास निहाल नाझिम मिर्झा (२४) हा तरुण पडला. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला बाहेर काढत कूपर रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

जेव्हीपीडी स्कीम परिसरातील उघड्या नाल्यात दुपारी एक व्यक्ती पडल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. याबाबतची माहिती दुपारी १२.०९ वाजता बृहन्मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाला मिळाली. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्य हाती घेत नाल्यात पडलेल्या तरुणाला बाहेर काढले. त्याला तत्काळ खासगी रुग्णवाहिकेद्वारे कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, कूपर रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, या घटनेचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai Local Mega Block : उद्या मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक; अनेक लोकल रद्द, एक्स्प्रेस गाड्यांनाही फटका

मुंबईत उष्माघाताचा धोका; दुपारी ११ ते २ प्रकल्प कामे बंद ठेवा, नगरसेविकेचे महापालिका आयुक्तांना पत्र

'देव त्यांचं भलं करो'; तनुश्री दत्ताच्या आरोपांवर नाना पाटेकरांचा मुलगा मल्हारने सोडलं मौन

Mumbai : अजय देवगणच्या जुहूतील बंगल्यावर BMC चा हातोडा! अनधिकृत बांधकामावर कारवाई; नेमकं प्रकरण काय?

Delhi Protest : अभिजीत दिपकेंना आज न्यायालयात हजर करणार; AISA च्या नेहा बोरा यांची सुटका