Mumbai : केईएमच्या कँटिनचा परवाना रद्द; अस्वच्छतेच्या कारणावरून FDA ची कारवाई संग्रहित छायाचित्र
मुंबई

Mumbai : केईएमच्या कँटिनचा परवाना रद्द; अस्वच्छतेच्या कारणावरून FDA ची कारवाई

अस्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या कारणावरून केईएम रुग्णालयाचा परवाना रद्द करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) हे कठोर पाऊल उचलले असून कँटिनचे कामकाज तत्काळ थांबवण्याचे आदेश दिले आहेत.

Swapnil S

मुंबई : अस्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या कारणावरून केईएम रुग्णालयाचा परवाना रद्द करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) हे कठोर पाऊल उचलले असून कँटिनचे कामकाज तत्काळ थांबवण्याचे आदेश दिले आहेत.

परळ येथील केईएम रुग्णालयाच्या 'ओल्ड नर्सेस होम' इमारतीच्या तळमजल्यावर कार्यरत असलेल्या 'मेसर्स स्टॅनी कॅटरर्स'वर ही कारवाई करण्यात आली आहे. एफडीएच्या परिमंडळ ३ च्या पथकाने १५ जुलै रोजी या कॅन्टीनची अचानक तपासणी केली होती, ज्यामध्ये अनेक गंभीर बाबी उघडकीस आल्या.

तपासणी दरम्यान कॅन्टीनमध्ये प्रचंड अस्वच्छता आढळली आणि 'अन्न सुरक्षा व मानके कायद्याच्या' तरतुदींचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे दिसून आले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी तत्काळ कामकाज अन्न बंद करण्याची नोटीस बजावली, तर सक्षम अधिकाऱ्यांनी कॅन्टीनचा व्यवसाय परवाना तातडीने निलंबित केला.

या कारवाई दरम्यान अधिकाऱ्यांनी प्रयोगशाळेत तपासणी करण्यासाठी अन्नाचे चार अधिकृत नमुने गोळा केले आहेत. यामध्ये शिजवलेला भात, मिश्र डाळींची भाजी, कच्चा माल म्हणून वापरला जाणारा काबुली चणा आणि रिफाइंड सूर्यफूल तेल यांचा समावेश आहे. हे नमुने आता तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत.

आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी मे महिन्यात महाराष्ट्र एफडीएचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यापासून अन्न व्यवसायांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

अय्यंगार बेकरीवरही बडगा

लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथील प्रसिद्ध 'बेंगलोर अय्यंगार्स बेकरी'वर अन्न सुरक्षा विभागाने धाड टाकून कारवाई केली आहे. अस्वच्छता तसेच एक्सपायरी कच्चा माल (व्हाईट कंपाऊंड चॉकलेट, ब्रेड पावडर) व मुदतबाह्य साठा वापरल्याचे आढळल्याने बेकरीचा परवाना तात्काळ निलंबित करून ती सील करण्यात आली आहे. सुमारे ३,०५९ रुपयांचा मुदतबाह्य कच्चा माल आणि ९ किलो खवा जागेवरच नष्ट करण्यात आला असून खवा आणि मिल्क टोस्टचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणी प्राध्यापक निलंबित; 'त्या' निवेदनावरून संस्थेची माफी

Mumbai : ‘बटरफ्लाय’ रोखणार पाणी गळती; जलवाहिन्यांवर बटरफ्लाय झडपा बसवणार, गणेश खणकर यांच्या मागणीची दखल

Mumbai : चौपाटी, विसर्जनस्थळी चोख व्यवस्थापन; देशभरातील तज्ज्ञांकडून पालिका, पोलिसांचे कौतुक

गणेश विसर्जनासाठी BMC सज्ज; ३८३ कृत्रिम तलावांची व्यवस्था, ६७ नैसर्गिक विसर्जनस्थळांवरही सुविधा, २५ हजार अधिकारी-कर्मचारी तैनात

बार्सिलोनामध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’; महाराष्ट्र मंडळ स्पेनतर्फे गणेशोत्सव, स्पॅनिश कलाकारांचाही सहभाग