Mumbai : खार दांडा येथे बोट उलटून एकाचा मृत्यू 
मुंबई

Mumbai : खार दांडा येथे बोट उलटून एकाचा मृत्यू

खार दांडा परिसरातील वारिन पाडा येथील दीपगृहाजवळ समुद्रात मासेमारी करत असताना बोट उलटल्याने दोन जण समुद्रात बुडाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली.

Swapnil S

मुंबई : खार दांडा परिसरातील वारिन पाडा येथील दीपगृहाजवळ समुद्रात मासेमारी करत असताना बोट उलटल्याने दोन जण समुद्रात बुडाल्याची घटना बुधवारी (दि. २७) सायंकाळी घडली. या दुर्घटनेत अशोक किशन राठोड (वय ५५) यांचा मृत्यू झाला असून केतन राठोड (वय ३२) हे जखमी झाले.

बुधवारी सायंकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास खार दांडा परिसरातील वारिन पाडा येथील दीपगृहाजवळ मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात उलटली. या दुर्घटनेत दोघेही पाण्यात पडले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

दोघांना समुद्रातून बाहेर काढत उपचारासाठी वांद्रे येथील भाभा महापालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले. अशोक किशन राठोड (वय ५५) यांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी मृत घोषित करण्यात आले, तर केतन राठोड (३२) यांची प्रकृती स्थिर असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान, या घटनेचा पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरण : गँगस्टर अबू सालेमच्या मुदतपूर्व सुटकेची याचिका फेटाळली; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Mumbai : राडारोडा वाहतूक करणाऱ्या वाहनांना नोंदणी अनिवार्य; २३ सप्टेंबरपर्यंत नोंदणीची मुदत

Thane : लोकलमधून महिला प्रवासी खाली पडली; दिवा-मुंब्रा वळणावरील Video व्हायरल

AI 80s Photo Trend : राजकीय नेत्यांनाही एआय ट्रेंडची भुरळ; १९८० च्या दशकातील रेट्रो लूक सोशल मीडियावर व्हायरल

ठाणे कोस्टल रोड-१च्या कामाला वेग; १४ महिन्यांत ४० टक्के काम पूर्ण