Mumbai : रिक्षावर झाड कोसळले; जखमी मुलगी आता ब्रेन डेड 
मुंबई

Mumbai : रिक्षावर झाड कोसळले; जखमी मुलगी आता ब्रेन डेड

खार पश्चिम येथील लिंकिंग रोडवर १० मे रोजी रिक्षावर झाड कोसळण्याच्या घटनेतील जखमी मुलगी ब्रेन डेड झाली आहे.

Swapnil S

मुंबई : खार पश्चिम येथील लिंकिंग रोडवर १० मे रोजी रिक्षावर झाड कोसळण्याच्या घटनेतील जखमी मुलगी ब्रेन डेड झाली आहे. या घटनेत रिक्षात बसलेल्या आरिका श्रीवास्तव ( १४) व हर्षिता कुमार (२३) या दोघी गंभीर जखमी झाल्या. दोघा जखमींना पी.डी. हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र गुरुवारी आरिका श्रीवास्तव (१४) ही मुलगी ब्रेन डेड झाली आहे. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून संबंधित विकासकावर गुन्हा दाखल करण्याची सूचना पोलिसांना दिली आहे. तसेच बांधकामाला स्टॉप वर्क नोटीस बजावण्यात आल्याचे बाजार व उद्यान समिती अध्यक्षा हेतल गाला यांनी सांगितले.

मुंबई बाजार व उद्यान समितीच्या अध्यक्षा हेतल गाला यांनी रुग्णालयात जाऊन जखमी मुलींची विचारपूस केली. त्यांनी सांगितले की, दोन्ही मुली ऑटो रिक्षातून प्रवास करत असताना अचानक झाड रिक्षावर कोसळले. ब्ल्यू स्टोन प्रॉपर्टीजतर्फे परिसरात इमारतीचे बांधकाम सुरू असून मुख्य प्रवेशद्वाराजवळील पिंपळाचे झाड अडथळा ठरत होते.

हे झाड सुकवण्यासाठी त्याला इंजेक्शन देण्यात आले होते आणि नंतर ते कापण्याचे काम सुरू असताना हा भीषण अपघात घडल्याचा आरोप करण्यात आला आहे.

घटनेनंतरही विकासक किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी जखमी मुलींची भेट घेतली नसल्याचेही बोलले जाते.

नवी मुंबईला 'धुक्याऐवजी' प्रदूषणाचा विळखा; पहाटे व्यायामाला आलेले नागरिक प्रदूषित हवेत, 'हेल्दी सिटी'च्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह

Mumbai Rain : मुंबईसह वसई-विरारमध्ये मुसळधार पाऊस; अनेक भागांत पाणी साचलं, ऑरेंज अलर्ट जारी, VIDEO

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या आझाद मैदानातील आंदोलनाला मुंबई पोलिसांचा नकार; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

Rajapur : गणपतीसाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांच्या गाडीला भीषण अपघात; ८-१० जण गंभीर जखमी, वाहनाचा चक्काचूर

Hartalika Teej 2026 : यंदा हरतालिका अन् गणेश चतुर्थी एकाच दिवशी; उपवास कधी सोडायचा? जाणून घ्या संपूर्ण माहिती